Job Icon

NHM अकोला भरती २०२६: विविध पदांची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर; येथे तपासा तुमचे नाव!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अकोला: पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून संभाव्य पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी (Provisional Merit List) आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

१. कोणत्या पदांसाठी ही यादी आहे?

अकोला NHM अंतर्गत खालील विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे:

  • डिस्टीक्ट प्रोग्राम मॅनेजर (Ayush)

  • बजेट आणि फायनान्स ऑफिसर (Budget & Finance Officer)

  • फॅसिलिटी मॅनेजर (Implementation Engineer)

  • ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist)

  • डेंटल हायजिनिस्ट आणि डेंटल असिस्टंट

  • ऑडिओमेट्रिक असिस्टंट

  • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट

  • इन्स्ट्रक्टर (Hearing Impaired Children)


हे पण वाचा: SSC Selection Posts Phase-XIV/2026 भरती जाहीर ,       फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा


२. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (हरकती नोंदवणे):

जर तुमचे नाव अपात्र यादीत असेल किंवा मिळालेल्या गुणांबाबत काही तक्रार असेल, तर तुम्ही तुमची हरकत नोंदवू शकता:

  • हरकत नोंदवण्याची मुदत: उमेदवारांनी जाहिरातीतील अटींनुसार आपल्या हरकती विहित मुदतीत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, अकोला येथे सादर कराव्यात.

  • आवश्यक कागदपत्रे: हरकतीसोबत आवश्यक ते मूळ पुराव्यांचे कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

३. अपात्रतेची काही प्रमुख कारणे (PDF नुसार):

अनेकांचे अर्ज खालील कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत:

  • पदासाठी आवश्यक असलेला किमान ३ वर्षांचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनुभव नसणे.

  • मूळ पदवी (Graduation) आवश्यक विषयामध्ये नसणे.

  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली नसणे.


निकाल आणि यादी कशी पाहायची?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या ‘Get Result’ बटणावर क्लिक करून आपली यादी (List) तपासावी.


Laduli Update
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अकोला: पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
📅 16.04.2026