🌐

Job Icon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणे

ज्ञानाचा सूर्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो,

आज १४ एप्रिल, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.

बाबासाहेब म्हणायचे, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि

जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’

त्यांनी अत्यंत गरिबीत राहून अफाट ज्ञान मिळवले आणि

आपल्या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. त्यांनी

आपल्याला समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण दिली.

अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम.

जय भीम! जय हिंद!”


विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

“नमस्कार,

आज आपण एका अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत

ज्यांनी केवळ एका समाजाचे नाही, तर

संपूर्ण देशाचे नशीब बदलले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे

केवळ एक नेते नव्हते, तर ते महान अर्थशास्त्रज्ञ,

कायदेतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी, याचे उत्तम उदाहरण

म्हणजे बाबासाहेबांचे जीवन. कोलंबिया

विद्यापीठात जाऊन त्यांनी भारताचे नाव सातासमुद्रापार नेले.

त्यांनी महिलांना अधिकार मिळवून दिले,

कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला.

आज आपण जे स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, त्यामागे

बाबासाहेबांच्या लेखणीची ताकद आहे.

त्यांच्या विचारांची कास धरून आपण भारताला महासत्ता बनवूया.

धन्यवाद!”


विषय: आधुनिक भारताचे निर्माते – डॉ. बी. आर. आंबेडकर

“व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशबांधवांनो,

१४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे एका क्रांतीचा जन्म झाला.

ज्याला लोक आज ‘भीमराव’ म्हणतात,

तो प्रत्यक्षात कोटी कोटी शोषितांचा आवाज होता.

बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ अस्पृश्यतेविरुद्ध नव्हता,

तर तो अज्ञानाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध होता.

त्यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला एकसंध ठेवण्याचे कार्य केले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा

त्यांनी दिलेला मंत्र आजही तरुणाईसाठी यशाची गुरुकिल्ली आहे.

त्यांनी सामाजिक लोकशाहीवर भर दिला.

ते म्हणायचे, ‘मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.’ आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ फटाके न वाजवता, एक पुस्तक वाचून त्यांच्या विचारांचा जागर करूया. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

जाते जाता एवढेच म्हणेन: नभाला टेकले हात ज्यांचे, तो सूर्य होता, कोटी कोटी दलितांचा, तोच एक आधार होता!

जय भीम!”


विषय: स्त्री उद्धारक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“उपस्थित बंधू आणि भगिनींनो,

बाबासाहेब म्हणायचे, ‘मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो.’

आज आपण ज्या महिलांना नोकरी करताना,

शिक्षण घेताना आणि मालमत्तेत हक्क मिळवताना पाहतो, त्याचे श्रेय

‘हिंदू कोड बिल’ मांडणाऱ्या बाबासाहेबांना जाते. त्यांनी स्त्रियांना केवळ मतदानाचा अधिकार दिला नाही, तर

त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मान दिला. अशा या महामानवाच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊया.

धन्यवाद!”



विषय: वादळाचा वारसदार – भीमराव

“अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम भीम सैनिकांनो…

आज मी अशा सूर्याबद्दल बोलणार आहे, ज्याचा कधीच अस्त झाला नाही. मित्रहो, इतिहास रक्ताने

लिहिला जातो असं म्हणतात, पण माझ्या भीमरायाने या देशाचा इतिहास रक्ताने नाही, तर ‘लेखणीच्या शाईने’ लिहिला आहे!

लोक म्हणतात बाबासाहेबांनी काय केलं? मी म्हणेन— ज्यांच्या हाताला आरसा धरण्याची बंदी होती,

त्यांच्या हातात या देशाची सत्ता देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं.

आज जो मजूर ८ तास काम करतोय, त्या ८ तासांच्या हक्कावर बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे.

आज जी बहीण-मुलगी ताठ मानेने शिकतेय, त्या शिक्षणाच्या वाटेवर बाबासाहेबांच्या कष्टाचा प्रकाश आहे.

बाबासाहेब हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नव्हते; ते या देशाच्या अस्मितेचे नाव आहे. जाता जाता एवढंच सांगेन—

‘वादळातून सावरलो आम्ही, वादळालाच आता विचारू नका, भीमरायाची मुले आहोत आम्ही, आमचा रस्ता रोखू नका!’

जय भीम! जय भारत!”

चारोळ्या आणि सुविचार 

  •  १: “दगड व्हा, पण कोणाचं डोकं फोडण्यासाठी नाही,

  • तर कोणाच्या प्रगतीचा पाया रचण्यासाठी!”

  • २: “पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही,

  • आणि संकटात पडल्याशिवाय सावरता येत नाही. – डॉ. आंबेडकर”

  •  ३: “नभाला टेकले हात ज्यांचे, तो सूर्य होता…

  • कोटी कोटी काळजांचा, तोच एक आधार होता!”

  • वादळातून सावरले आम्ही, वादळालाच आता विचारू नका,
  • भीमरायाची मुले आहोत आम्ही, आमचा रस्ता रोखू नका!

व्यासपीठावर गाजणारे ‘मोठे’ भाषण (Powerful Speech for Stage)

विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक क्रांतीचे नाव

“सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि

येथे जमलेल्या माझ्या तमाम भीम सैनिकांनो,

आज आपण अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत,

ज्यांच्या जन्मानंतर या देशातील ‘इतिहास’ बदलला आणि कोट्यवधी

लोकांचा ‘नशिब’ बदललं. मित्रहो, जगाच्या नकाशावर आज

भारताच नाव जे सन्मानाने घेतल जात, त्यामागे एकच डोक चाललय, ते म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’.

लोक विचारतात बाबासाहेबांनी काय दिल? मी सांगेन, बाबासाहेबांनी फक्त ‘संविधान’ दिल नाही, तर त्यांनी या देशातील शेवटच्या रांगेत उभा असलेल्या माणसाला ‘सत्ता’ दिली. ज्या हातांना मंदिरात जाण्याची बंदी होती,त्या हातांना त्यांनी संसदेचे दरवाजे उघडून दिले.ज्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लढा द्यावा लागला, त्यांना त्यांनी या देशाचे राज्यकर्ते बनवलं.बाबासाहेब म्हणायचे, ‘नशिबावर विश्वास ठेवू नका, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.’आज आपण जे इंटरनेट वापरतोय, ज्या लोकशाहीत जगतोय आणि ज्याअधिकाराने आपण आपले प्रश्न मांडतोय, त्या प्रत्येकअधिकारामागे बाबासाहेबांच्या लेखणीची ताकद आहे. कोलंबिया विद्यापीठापासून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत ज्ञानाचा झेंडा फडकवणारा हा वाघ जेव्हा भारतात परतला, तेव्हा त्यांनी फक्त स्वतःचं घर नाही सावरलं, तर संपूर्ण देश सावरला.म्हणून आज जयंतीला फक्त हार अर्पण करू नका, तर त्यांचे विचार आत्मसात करा.

शिका, संघटित व्हा आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला शिका. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!

‘कोटी कोटी काळजांचा, तोच एक आधार होता… माझ्या भीमरायाचा विचार, हाच देशाचा आधार होता!’

जय भीम! जय हिंद!”


विषय: भीमरायाचा तुझा विजय असो!

“मित्रहो,

काळोखाच्या साम्राज्यात जेव्हा न्यायाचा सूर्य मावळला होता,

तेव्हा भीमराया नावाचा एक प्रकाशपुंज जन्माला आला.

त्यांनी चवदार तळ्याचा पाणी संघर्ष केला कारण त्यांना तहान भागवायची नव्हती,

तर त्यांना माणसाला माणुसकीची ओळख करून द्यायची होती.

ज्या हातांना लेखणी पकडण्याचा अधिकार नव्हता, त्या हातांनी आज या देशाचे

भविष्य (संविधान) लिहिले आहे. बाबासाहेब केवळ एका ठराविक समाजाचे

नव्हते, तर ते अठरापगड जातींच्या आणि प्रत्येक शोषितांच्या न्यायाचे कैवारी होते.

आज आपण ताठ मानेने जगतोय, कारण त्या महामानवाने स्वतःचे आयुष्य आपल्यासाठी खर्ची घातले.

कोटी कोटी काळजांचा तोच एक आधार होता, माझ्या भीमरायाचा विजय असो!


“विषय: बाबासाहेबांचे अर्थशास्त्र आणि शेती” (शेतकरी पुत्रांसाठी खास)

“उपस्थित बांधवांनो,

आपण बाबासाहेबांना फक्त संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण

ते एक महान अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ज्या संकल्पनेवर उभी आहे,

ती बाबासाहेबांनीच मांडली होती.

ते म्हणायचे, ‘जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही, तोपर्यंत देश समृद्ध होणार नाही.’

त्यांनी त्याकाळी नदी जोड प्रकल्पांची आणि वीज निर्मितीची स्वप्ने पाहिली होती.

आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ हार अर्पण न करता,

त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेती आणि उद्योगात आधुनिक ज्ञानाचा

वापर करण्याचा संकल्प करूया. कष्टकऱ्यांच्या घामाला दाम

आणि सन्मान मिळवून देणे, हीच खरी बाबासाहेबांची शिकवण आहे.

जय भीम!”


“विषय: भीमरायाचे उपकार” (ओघवती आणि जोशपूर्ण शैली)

“मित्रांनो,

जर बाबासाहेब नसते तर आज मी इथे बोलू शकलो नसतो आणि तुम्ही

तिथे ऐकू शकले नसतात. ज्या काळात सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा,

त्या काळात या माणसाने स्वतःच्या मुलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून आपल्या

सर्वांसाठी न्यायाची लेखणी चालवली.

त्यांनी आपल्याला ‘मतदानाचा अधिकार’ देऊन राजा बनवलं. एका गरीब घरातील

मुलगा सुद्धा या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो,

ही ताकद बाबासाहेबांच्या संविधानाने दिली आहे.

म्हणून म्हणतात ना— ‘नभाला टेकले हात ज्यांचे, तो सूर्य होता… माझ्या भीमरायाचा विचार, हाच देशाचा आधार होता!’

अशा या ज्ञानाच्या महासागराला माझे मानाचे अभिवादन!”


“Respected Audience,

Dr. B.R. Ambedkar once said, ‘I measure the progress of a community

by the degree of progress which women have achieved.’

This single sentence defines his vision for a modern India.

He was a scholar who studied for 18 hours a day.

He proved that greatness is not born in royal palaces,

but in the fire of struggle and education. Today,

India is recognized globally because of our strong Democratic Constitution.

Let us pledge today to fight against inequality and discrimination.

Let us be the ‘Ambedkarites’ in true sense

by spreading knowledge and helping the needy.

Education is the key, and Equality is the Goal. > Jai Bhim! Jai Hind!”


डॉ. बी.आर. आंबेडकर: शतकातील सर्वात मोठे समाजसुधारक आणि आधुनिक भारताचे निर्माते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका चळवळीचे नेते नव्हते, तर ते

आधुनिक भारताचे मुख्य शिल्पकार होते. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:

  • शिक्षणाचा संघर्ष: १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे जन्मलेल्या

  • भीमरावांना शालेय जीवनात प्रचंड भेदभावाचा सामना करावा लागला.

  • वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारा हा मुलगा पुढे

  • जाऊन जगातील सर्वात विद्वान व्यक्तींपैकी एक झाला.

  • ज्ञानाचा महासागर: बाबासाहेबांकडे एकूण ३२ पदव्या होत्या

  • आणि त्यांना ९ भाषांचे ज्ञान होते. त्यांच्याकडे ५०,००० हून अधिक पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय होते,

  • ज्याला ‘राजगृह’ असे म्हटले जाते.

  • सामाजिक क्रांती: चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि

  • काळाराम मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून त्यांनी मानवी हक्कांचा पुकार केला.

  • त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘माणूस धर्मासाठी नाही, तर धर्म माणसासाठी आहे.’

  • संविधानाची निर्मिती: फाळणीनंतरच्या कठीण काळात भारताला एकत्र

  • ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठे आणि लवचिक संविधान लिहिले.

  • यामध्ये त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची हमी दिली.

  • स्त्रियांचे अधिकार: हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी

  • भारतीय महिलांना मालमत्तेत हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि शिक्षणाची संधी मिळवून दिली.


Latest Job