जनरल व्हिक्टर मिलेशची योजना (सोळावी योजना) ती अशी जर्मन चढाई ही ॲक्सेस लॉरेन या दुर्गम प्रदेशातून असंभव वाटल्यामुळे तटस्थ बेल्सियम प्रदेशातून जर्मनी आक्रमण वरील या गृहित करत्यावर आधारभूत होती. म्हणून जर्मनीची चढाई होण्यापूर्वीच बेल्सियम ची तटसंस्था भंग करूनही जर्मनीवर हल्ला चढवावा, अशी ही मिशन योजना होती. मिशेलची योजना जर्मनीच्या पथ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे फ्रान्स आक्रमण जर्मनीला संरक्षणासाठी युद्ध करावे लागेल, असे जगणे म्हटले असेल, मिशेलची योजना नामंजूर झाली. मिशेलला पदच्यूत करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल झाफ्रने एक मध्यभागी योजना ( सतरावी योजना) आखली. ती पुढीलप्रमाणे
त्योनव्हिन मेंटेनन्स या प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण बाजूंनी ॲलेक्स लॉरेन च्या प्रांतावर द्विमुखी हल्ला चढवणे. त्याच बरोबर जर्मनीने बेल्जियम मधून जर आक्रमण केलेच तर तिकडे दोन फ्रान्स सेना प्रतिकारांसाठी पाठवणे, अशी ही झौफ्र योजना होती.
झौफ्र योजनेत पुढील दोष होते:
१). रशियाची सेना जर्मन सेनेला विरुद्ध करण्यास समर्थ असल्याचा विश्वास
२). ब्रिटिश अभियान सेना फ्रान्स आघाडीच्या डाव्या बागेवरीलं फ्रेंच सेनेला तथातथ्य सहाय्य करील अशी अपेक्षा
३). युद्ध आघाड्यांवर जर्मन सेना खड्या करील व जर्मनीची युद्धक्षमता किती असेल या विषयीची अंदाज चुकीचे ठरणे, प्रारंभीच्या लढ्यात फ्रान्सकडे १३ लक्ष, तर जर्मनी कडे जवळ जवळ २० लक्ष सैनिक खडे आणि राखीव होते.
रशियाची योजना:
ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या युद्धघोषणेमुळे एकच वेळी दोन आघाड्यांवर चढाया करणे भाग पडले. यासाठी त्वरेने सक्तिसैनिक भरती करण्यास रशिया अक्षम होते त्यावेळी पूर्व प्रशियात मार खावा लागला. भरीला भर रशियाची उच्च युद्नेते आपापसांत भांडणारे व युद्धनेतृत्वात निकृष्ठ होते. ऑस्ट्रियाच्या ढीलेपणामुळे गॅलिशियात थोडेफार विजय रशियात मिळाले.
रशियाच्या सेनेत धैर्यवान पण मवाळ व कटक शेतकरी सैनिक बहुसंख्येने होते. सेनेत शास्त्रस्त्र व दारूगोळा यांचा तुटवडा होता. उच्च सैनिकी नेतृत्व बेफिकीर व अकार्यक्षम होते.
ऑस्ट्रियांची योजना:
जनरल ह्यासेनडोर्फ यांने सर्बिया विरुद्ध व रशिया या दोघांविरुद्ध अशा योजना तयार केल्या होत्या तथापि युद्धघोषणा तयार करताच पहिली योजना अमलात आणली त्यामुळे कोणत्याच आघाडीवर पुरेसे सैन्य उभे करणे शक्य झाले नाही. ती जरी दोस्त राष्ट्रे होती, तरी ऑस्ट्रिय व जर्मनी या मध्ये युद्ध लढण्याची त्यांच्यात समन्वय व एकसूत्रता नव्हती. परिणामी ऑस्ट्रिया व जर्मनीच्या गळ्यातील लोढणे ठरले.
युध्दहेतू:
या युध्दात भाग घेण्याचे कोणतेही युद्ध हेतू कोणत्याही युद्धमान राष्ट्राने सुस्पष्टपणे जाहीर केले नव्हते. स्वराष्ट्र संरक्षणासाठी आपण बाहेर पडलो म्हणून युद्धात विजय मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते. युद्धाच्या अखेर पर्यंत व्यवहारीक युद्ध हेतू पुढीलप्रमाणे
१). फ्रान्स स्वराष्ट्र प्रदेशातून (१८७० साली जर्मनीने बळकावलेला ॲलेक्स लॉरेन प्रांत धरून) जर्मनीला हाकलून लावणे.
२). ब्रिटन बेल्जियम ची जर्मन पाशातून मुक्तता करणे.
३). रशिया हे प्रमुख बालयुक्त राष्ट्र म्हणून जगणे.
४). जर्मनी आक्टोंबर १९१८ पर्यंत, पादाक्रांत प्रदेश ताब्यात ठेवणे व बेल्सियम आणि ईशान्य फ्रान्सवर नियंत्रण ठेवणे .
५). बाल्कन प्रदेशावर जर्मन प्रभुत्वाची छाया घालणं. किंबहुना संपूर्ण युरोपावर जर्मनीचे प्रभुत्व मिळवणे, पुढे या उद्दिष्टांमुळे जर्मनीला किरकोळ फेरफार करावे लागेल.
युद्ध हेतू मध्ये जर्मनीला युद्धपरिस्तीती प्रमाणे बदल करावे लागेल पराभव अटळ आहे हे दिसल्यावर अपमानास्पद व कडक अटींचा तह टाळण्याकडे जर्मन नेत्यांची दृष्टी वळली. दोस्त राष्ट्रांना अमेरिका वगळताना, जसजशी जायची खात्री होत गेली. तसतसे यांच्याही युद्धेतूत बदल होत गेल्याचे दिसते. व्हर्सय तह व युधमान राष्ट्रांनी केलेले आपापसातील वेगवेगळे तह तसेच त्यांच्यातील गुप्त व उघड तरतुदी यांवरून पाश्यातच राष्ट्रांनी स्वहितांसाठी युद्धाचा उपयोग करून घेतला.
उदा. तुर्की साम्राज्याची वाटणी वसाहती व पाश्यात्य राष्ट्रांच्या साम्राज्यातील राष्ट्रांना स्वानिरण्यांचे तत्व लागू न करणे अमेरिकी राष्ट्र अध्यक्ष ब्रुडो विल्सन यांच्या चौदा कलमी राजकीय तरतुदीकडे दुर्लक्ष करणे वगैरे.
युद्धघटना
युद्धांचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. या महायुद्धातील युद्धमान राष्ट्रांचे दोन तट होते, ते असे
मध्यवर्तीय राष्ट्रीय तट : जर्मनी , ऑस्ट्रिया हंगेरी या तटात १९१४ मध्ये तुर्कस्तान व ऑक्टोबर १९१५ मध्ये बल्गेरिया सामील झाले.
दोस्त राष्ट्रीय तट: रशिया फ्रान्स ग्रेट ब्रिटन या तटात १९१५ मध्ये इटली ऑगस्ट १९१६ मध्ये रोमेनिया व एप्रिल १९१७ मध्ये अमेरिका सामील झाले. यांच्याशिवाय बेल्सियम, सर्बिया,जपान, इटली, ग्रीस पोर्तुगाल माँटेनिग्रो ही राष्ट्रे या तटात होती. हिंदुस्तान ब्रिटिशांकित असल्याने ब्रिटींबरोबरच त्याला युद्ध लढावे लागले, हे युद्ध मर्यादित राहील व काही आठवड्यातच आटोपेल हा होरा साफ चुकून ते चार वर्षे चालले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम करण्यात आला. मध्यवर्ती तटाचा पराभव झाला.
या महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामिल झाली होती व ३८ राष्ट्रानी शांतता स्थापनेच्या कार्यात भाग घेतला.
महायुद्धांचे प्रमुख घटकांचा सलवार आढावा पुढील प्रमाणे आहे.
पश्चिम आघाडी फेरफार केलेल्या (१९१४) च्या श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मन सैन्याने बेल्सियम वर चढाई केली. तथापि अनपेक्षित असा प्रतिकार बेल्सियम सैन्याने केल्याने श्लिफेन योजना ढासळली. दोन आठवड्याच्या लढ्यानंतर ब्रुसेल्स ही बेल्सियम ची राजधानी जर्मनांनी ४२ से. मी च्या व्यासाच्या प्रचंड तोफांनी निकामी केले व २० ऑगस्ट रोजी जर्मनांनी बेल्सियम ला पादाक्रांत केले. या दोन आठवड्यात ब्रिटिश अभियान सेनेला फ्रान्स मध्ये उतरणे शक्यं झाल्याने सो. नदीच्या उत्तरेला व कॅलेच्या पूर्वेला तिने आपले ठाण मांडले. श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मनीची आगेकूच फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे होण्या ऐवजी सरळ पॅरिसच्या पूर्वेकडे होत असल्याचे जर्मनांच्या लक्षात आले. पॅरिस पासून ३० की. अंतरावर जर्मन सिनेची बिनी पोहचल्यावर फ्रान्स सरकारने, बार्दो या गावी स्थलांतर केले जसजसा चढाईचा वेग मंदावला तसतसा जर्मन सेनेला रसद व दारूगोळा पुरवठा करण्याचे वेळीच्यावेळी कठीण जाऊ लागले. ऑगस्ट च्या उन्हाळ्यातील पायपीटीने जर्मन पायदळ थकून गेले. सप्टेंबर मध्ये दि. ५ ते १० सुप्रसिद्ध मार्ण नदीची लढाई झाली. फ्रान्सच्या जनरल झाफ्रनेही प्रतिहाल्याची लढाई लढवली. या प्रतिहल्यात आगेकूच करणाऱ्या जर्मनीच्या फूट पडून त्यांच्या बगला व पिछाड्या उघड्या पडल्या, जर्मन चढाईची मंद गती आणि फ्रेंच व बेल्सियम सैन्याचा विरोध तसेच त्यामुळे शिल्फेन योजनेचा उडालेला बोजवारा त्रस्त झाला. मोलताकें याने जर्मन सैन्याला माघारीचा हुकूम दिला. १० सप्टेंबर रोजी मार्णची प्रतिहल्ला लढाई आटोपली. मार्णची लढाई जरी राणतंत्राच्या दृष्टीने निर्णायक झाली नाही तरीही दुरपरीमानाच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रे विजयी झाली. मार्णच्या लढाईत जर जर्मन विजयी झाले असते तर विसाव्या शतकाच्या इतिहासात मूलगामी बदल घडवून आणले असते. वाटलुरच्या लढाईनंतर १८१५ ही मार्ण ची निर्णायक म्हणून प्रसिद्ध झाली. फ्रान्सचा त्रातां म्हणून झार्फ मान्यता पावला. १४ सप्टेंबर रोजी मोल्तेकेला पदच्युत करण्यात आलें . त्याच्या जागी जनरल एरिक फोन फाल्केन हाईन यांची नियुक्ती झाली.
वरील १४ सप्टेंबरच्या लढ्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निष्कर्ष काढण्यात आले.
१). फ्रान्सची आरंभीची चढाई योजना ही युद्ध संकल्पना व तिची अंबालबजवना व दृष्टिकोनातून आस्ववादी ठरली.
२). जर्मन योजना निर्दोष असून मोल्टकेच्या अकार्यक्षमेमुळे फसली.
३). प्रारंभीच्या अपयशानंतर झॉफ्रा ने जर्मन सेनापतीच्या चुकांचा लाभ घेऊन मार्न या प्रतिहल्ला चढाईत यश मिळवले.
४). प्रारंभीच्या लढाईत फ्रान्स ने अडीच लाख सु. ३ लाख सैनिक मारले गेले वा निकामी झाले.
५). गतिमान लढ्याचा काल संपून खडकी युद्ध तंत्राचा पाया घातला गेला.
पूर्व आघाडी
रशियाने अनपेक्षितपणे व त्वरेने सेना सज्ज केली. तथापि पूर्ण प्रशिया व ऑस्ट्रिया या दोघांवर एकाच वेळी चढाई करण्याची चूक त्यांच्या हातून घडली. ऑस्ट्रिया वरील चढाईत ऑस्ट्रिया वर मात करून त्याचा गॅलिशिया हा प्रांत रशियाने काबीज केला. मोल्कतेने निवृत्त झालेल्या फील्ड मार्शल हिंदंबुर्खला परत कामावर बोलावून त्यावर पूर्व प्रशियाच्या संरक्षणाची पूर्व जबाबदारी सोपवली. हिंदेनबुर्ख व त्याचा चीफ ऑफ स्टाफ लुडेनडॉर्फ यांनी त्यानबर्ग आणि माझ्युरिअन सरोवर येथील लढ्यात रशियाच्या सैन्याच्या जबरदस्त पराभव केला. रशियाला अमाप रानसमर्गीला मुकावे लागले. १९१४ अखेरपर्यंत रशियाने ६३ लक्ष सैनिक सज्ज केले होते. तरीही त्यापैकी २१ लक्ष सैनिकपाशी शस्त्र नव्हती. या लढ्याच्या धक्क्यातून रशियाला वर मन करणे शक्य झाले नाही. जर्मन सैन्याचा आत्मविश्वास वाढला अशा वेळी रशिया विरुद्ध तुर्कस्थान युद्धात उतरले. दर्डनेल्सच्या खाडीतून होणाऱ्या रशियाच्या दालन वळण व पुरवठा मार्गाच्या नाड्या आवरणे तुर्कस्थानला शक्य झाले. १९१४ च्या अखेरीस सर्बियन ऑस्ट्रियांचे आक्रमण कौशल्याचे हाणून पाडले.
******