
📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| विधी अधिकारी (कंत्राटी) | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (Law Graduate). २. Constitutional किंवा Administrative विषयात पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. ३. उमेदवार सनद धारक (Advocate Sanad) असावा. ४. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान व MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक. | 1 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक: | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विधी अधिकारी (कंत्राटी) पद भरती २०२६
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, चंद्रपूर (सामान्य प्रशासन विभाग) यांच्यातर्फे जारी करण्यात आलेल्या जाहिरात क्र. ०१/२०२६ नुसार, जिल्हा परिषद स्तरावरील न्यायालयीन कामकाजासाठी विधी अधिकारी (Legal Officer) हे पद कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित मुदतीत अर्ज मागवण्यात येत आहेत. ZP Chandrapur Bharti
📋 भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)
| तपशील (Details) | माहिती (Information) |
| संस्थेचे नाव | जिल्हा परिषद, चंद्रपूर (सामान्य प्रशासन विभाग) |
| जाहिरात क्रमांक | जाहिरात क्र. ०१/२०२६ |
| पदाचे नाव | विधी अधिकारी (कंत्राटी – Legal Officer) |
| एकूण जागा (Total Vacancies) | ०१ पद |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | चंद्रपूर (महाराष्ट्र) |
| मानधन (Salary) | एकत्रित मानधन प्रतिमाह ₹३०,०००/- (अधिक नियमानुसार प्रवास भत्ता) |
| निवडीची पद्धत | प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणी किंवा प्रत्यक्ष मुलाखत (तोंडी) |
| अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत |
| अधिकृत संकेतस्थळ |
🎓 शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा तक्ता
| पदाचे नाव | एकूण जागा | शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) A | अनुभव (Experience) | वयोमर्यादा (Age Limit) |
विधी अधिकारी (कंत्राटी) | ०१ | १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (Law Graduate). २. Constitutional किंवा Administrative विषयात पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. ३. उमेदवार सनद धारक (Advocate Sanad) असावा. ४. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान व MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक. | मा. उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयांमध्ये विधी कामकाजाचा/वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षांचा अनुभव (वकालतनामा किंवा शपथपत्रासह). | नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक) |
💳 परीक्षा व अर्ज शुल्क (Application Fee)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा अर्ज शुल्क आकारण्यात आल्याबाबत जाहिरातीत स्पष्ट नमूद केलेले नाही. सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
🌐 अर्ज कसा करावा? (How to Apply)
१. उमेदवारांनी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून (zpchandrapur.maharashtra.gov.in) जाहिरात व अर्जाचा नमुना प्राप्त करावा.
२. अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व शैक्षणिक, अनुभवाची व वयाची प्रमाणपत्रे जोडवीत.
३. निर्धारित मुदतीत म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत संबंधित कार्यालयीन पत्त्यावर अर्ज सादर करावा.
४. नियुक्ती ही प्राथमिक स्वरूपात ११ महिन्यांच्या करारावर राहील.
अटी व शर्ती :-
१. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाची नेमणूक ही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असेल ही नियुक्ती न्यायालयीन
प्रकरणाची देखरेख करण्यासाठी जिल्हा परिषद, चंद्रपूर व पंचायत समिती कार्यालयातील मा.न्यायालयीन
प्रकरणी कायदेशीर सल्ला देण्याकरीता भरण्यात येत असल्याने सदर कंत्राटी विधी अधिकारी शासकीय
कर्मचारी म्हणुन गणल्या जाणार नाहीत. तसेच याबाबत भविष्यात तसा दावाही करता येणार नाही.
२. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाची नेमणूक करार पद्धतीने प्रथमतः ११ महिन्यासाठी करण्यात येईल ११
महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल. तथापी अशी मुदत
वाढविताना एकावेळी ही मुदत ११ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असणार नाही. अशा प्रकारे जास्तीत
जास्त तीन वेळा नियुक्ती करता येईल. त्यानंतर पुनःश्च नियुक्ती करावयाची असल्यास निवड प्रक्रियेला
सामोरे जावे लागेल.
३. नियुक्तीच्या वेळी रुपये ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर जिल्हा परिषद समवेत बंधपत्र करार करावा लागेल.
४. करार पद्धतीने नेमणूक करण्यात आल्यानंतर एकत्रित मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय
राहणार नाही.
५. विधी अधिकारी (कंत्राटी) यांना कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) वाजेपर्यंत जिल्हा
परिषद कार्यालयात पुर्णवेळ उपस्थित राहावे लागेल.
६. विधी अधिकारी (कंत्राटी) यांची इतर शासकीय कार्यालयात विधीतज्ञ म्हणुन नेमणूक झालेली नसावी.
७. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्ती वेळी ४५ वर्षापेक्षा जास्त नसावी.
८. जिल्हा परिषद कार्यालयातील कामकाजाबाबतच्या गोपनियतेचा भंग होता कामा नये.
९. विधी अधिकारी (कंत्राटी) यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना मा. न्यायालयात खाजगी नोरकी/व्यवसाय व
इतर संस्थेत अथवा कार्यालयात काम करता येणार नाही.
१०. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहिल.
११. संगणक अर्हता (MS CIT तथा तत्सम) परिक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.
१२. उमेदवारांना आस्थापनेविषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अश्या सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा
विभागीय चौकशी इत्यादी बाबत ज्ञान असणे आवश्यक राहील.
१३. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक राहील.
१४.जरुरी वाटल्यास किंवा काम असमाधानकारक असल्याचे वाटल्यास कोणत्याही वेळी ११ महिन्याचा
कालावधी पुर्ण होण्यापुर्वी नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.
ZP Chandrapur Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
ZP Chandrapur Legal Officer Bharti 2026 जाहीर: जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विधी अधिकारी पदांची कंत्राटी भरती