New भरती
अर्ज सुरू आहे
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., ( सतत भेट देत राहा:) Laduli.in ला
🗓️ अर्ज सुरू तारीख: 07-10-2026
🗓️ शेवटची तारीख: 21-10-2026 5:00 PM
📍 नोकरी ठिकाण: ठाणे जिल्हा (संबंधित तालुका/सजा)
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 111
💰 परीक्षा फी: खुला प्रवर्ग: ₹600/- / मागास प्रवर्ग: ₹500/-
📏 वयोमर्यादा: [As on 01-10-2026] (i) : 18 ते 40 वर्षे
📝 परीक्षा तारीख: १५ नोव्हेंबर २०२६ (संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी)

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
तहसील कार्यालय ठाणे४ थी पास24
तहसील कार्यालय भिवंडी (नॉन पेसा क्षेत्र)४ थी पास11
तहसील कार्यालय भिवंडी (पेसा क्षेत्र)४ थी पास3
तहसील कार्यालय कल्याण४ थी पास14
तहसील कार्यालय अंबरनाथ४ थी पास21
तहसील कार्यालय मुरबाड (पेसा २५% ते ५०% व ५०% पेक्षा जास्त)४ थी पास4
तहसील कार्यालय मुरबाड (पेसा ० ते २५%)४ थी पास4
तहसील कार्यालय मुरबाड (नॉन पेसा क्षेत्र)४ थी पास11
तहसील कार्यालय शहापूर (पेसा २५% ते ५०% व ५०% पेक्षा जास्त)४ थी पास11
तहसील कार्यालय शहापूर (पेसा ० ते २५%)४ थी पास8
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in ला बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

Revenue Sevak Kotwal Recruitment 2026: ठाणे जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांची भरती जाहीर, ४ थी पाससाठी सुवर्णसंधी!

महत्त्वाच्या माहितीचा तक्ता (Quick Information Table):Thane Kotwal Bharti 2026

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे (महसूल विभाग)

पदाचे नाव

महसूल सेवक (कोतवाल)

एकूण जागा (Total Vacancies)

विविध तालुक्यांनुसार 111 रिक्त जागा (उदा. ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर)

शैक्षणिक पात्रता (Education)

किमान ४ थी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit)

दिनांक ०१/१०/२०२६ रोजी १८ ते ४० वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी नियमांनुसार सवलत)

वेतन / मानधन

दरमहा ₹१५,०००/-

नोकरीचे ठिकाण (Job Location)

ठाणे जिल्हा (संबंधित तालुका/सजा)

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन (Online)

शेवटची तारीख

२१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

परीक्षेची तारीख

१५ नोव्हेंबर २०२६ (संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी)

परीक्षा शुल्क (Fee)

खुला प्रवर्ग: ₹६००/- / मागास प्रवर्ग: ₹५००/-

अधिकृत संकेतस्थळ

https://thane.kotwal.org

Thane Kotwal Bharti 2026

शैक्षणिक पात्रता (Education):

  • महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता ४ थी पास इतकी आहे.

  • उमेदवार ज्या तालुक्यातील पदासाठी अर्ज करत आहे, त्याच तालुक्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

तालुकनिहाय रिक्त पदांचा तपशील (Vacancies Details Table):

अ.क्र.तहसील कार्यालय / क्षेत्रएकूण रिक्त जागा
१तहसील कार्यालय ठाणे

२४ जागा

२तहसील कार्यालय भिवंडी (नॉन पेसा क्षेत्र)

११ जागा

३तहसील कार्यालय भिवंडी (पेसा क्षेत्र)

०३ जागा

४तहसील कार्यालय कल्याण

१४ जागा

५तहसील कार्यालय अंबरनाथ

२१ जागा

६तहसील कार्यालय मुरबाड (पेसा २५% ते ५०% व ५०% पेक्षा जास्त)

०४ जागा

७तहसील कार्यालय मुरबाड (पेसा ० ते २५%)

०४ जागा

८तहसील कार्यालय मुरबाड (नॉन पेसा क्षेत्र)

११ जागा

९तहसील कार्यालय शहापूर (पेसा २५% ते ५०% व ५०% पेक्षा जास्त)

११ जागा

१०तहसील कार्यालय शहापूर (पेसा ० ते २५%)

०८ जागा

(टीप: प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांसाठी ३०% पदे आरक्षित असून, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुला प्रवर्ग यानुसार समांतर पदे वाटप केलेली आहेत.)

रिक्त पदांचा आणि तालुक्यांचा तपशील (Vacancies & Locations):

ठाणे जिल्ह्याअंतर्गत खालील तहसील कार्यालयांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे:

  • तहसील कार्यालय ठाणे

  • तहसील कार्यालय भिवंडी (पेसा व नॉन-पेसा क्षेत्र)

  • तहसील कार्यालय कल्याण

  • तहसील कार्यालय अंबरनाथ

  • तहसील कार्यालय मुरबाड (पेसा व नॉन-पेसा क्षेत्र)

  • तहसील कार्यालय शहापूर (पेसा व नॉन-पेसा क्षेत्र)

महत्त्वाच्या अटी व पात्रता (Important Instructions & Eligibility):

  1. स्थानिक रहिवासी: अर्जदार ज्या तालुक्यातील पदासाठी अर्ज करत आहे, त्याच तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. निवडीनंतर संबंधित सजाच्या ठिकाणी वास्तव करणे बंधनकारक राहील.

  2. शारीरिक पात्रता: उमेदवाराने महसूल सेवक पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. हे पद एकाकी असल्याने यात दिव्यांग किंवा प्रकल्पग्रस्तांसारखी समांतर आरक्षणे लागू नाहीत.

  3. चारित्र्य व कागदपत्रे: अर्जदाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी. तसेच अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन (नमुना ‘अ’) जोडणे बंधनकारक आहे.

परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern):

  • लेखी परीक्षा १०० गुणांची असेल

  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (एकूण ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) असेल.

  • परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल.

  • या परीक्षेत Negative Marking (चुकीच्या उत्तरासाठी गुण कट करणे) पद्धत लागू नाही. उमेदवारास लेखी परीक्षेत किमान ४० गुण मिळवणे आवश्यक आहे

Thane Kotwal Bharti 2026


निवडीसाठी कार्यपद्धती, अटी व शर्ती:

१) लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.

२) लेखी परीक्षेअंती पात्र उमेदवारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परीक्षा शुल्क, मूळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल अथवा अशा उमेदवारांचे मागितलेले सामाजिक आणि/किंवा समांतर आरक्षण अथवा प्रक्रिया शुल्क इत्यादींसारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.

३) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व उमेदवाराची पात्रता वैद्यकीय तपासणीअंती निश्चित करण्यात येईल.

४) उमेदवारांचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

५) कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवण्याबाबतचे रुपये ५०० च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

६) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. केओटी-६०७३/३०००४/ल, दिनांक २८/०२/१९७४ नुसार महसूल सेवक (कोतवाल) म्हणून नेमणूक करताना इतर सर्व निकष समान असतील तर त्या सजातील पूर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल. तसेच कोतवालांच्या वारसाव्यतिरिक्त इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक १३ जून २०१८ मधील नमूद निकषावर लावला जाईल.

७) उमेदवार हा महसूल सेवक या पदासाठी अर्ज केलेल्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

८) उमेदवार कोणत्याही एकाच तालुक्यातील स्थानिक/कायमचा रहिवासी असू शकतो. सबब उमेदवाराने अशा त्याच तालुक्यातील पदासाठी अर्ज करावा.

९) तालुकानिहाय अंतिम निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून सजा वाटप करण्यात येईल.

१०) संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्व तालुक्यातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी दिनांक १५/११/२०२६ रोजी परीक्षा घेण्यात येईल.

११) संपूर्ण भरती प्रक्रिया तालुकानिहाय होणार असून कोणत्याही दोन तालुक्याच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल.

१२) महसूल सेवक (कोतवाल) हे पद वर्गीकृत नाही.

१३) कोतवालांना क्षेत्रीय स्तरावर (Field Work) काम करावे लागते, त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना दिव्यांगासाठीचे आरक्षण लागू करण्यात आलेले नाही.

१४) महसूल सेवक (कोतवाल) हे पद एका सजात एकच असते. त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू यासारखी समांतर आरक्षणे लागू नाहीत.

१५) जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. बीसीसी २०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब दि. १२/१२/२०११ मधील तरतुदीनुसार याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५/०८/२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून, तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.

१६) महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांचेसाठी आरक्षण अधिनियम, २००१ (सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ८) हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दि. २९ जानेवारी २००४ पासून अंमलात आणला आहे. त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमीलेयर) तत्व वि.जा.अ., भ.ज.ब., भ.ज.क., भ.ज.ड., वि.मा.प्र. व इ.मा.व. यांना लागू आहे. सदर प्रवर्गातील उमेदवारांकडे सन २०२६-२७ पर्यंत वैध असलेले नॉनक्रिमीलेयरचे सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नॉनक्रिमीलेयरचे तत्व अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागासप्रवर्गांना लागू राहील.

१७) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असेल त्यांनी तशी मागणी ऑनलाईन अर्जात करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय महिला व बालकल्याण क्र. ८२/२००१/म.से.आ२०००/प्र.क्र.४१५/का.२, दि. २५/०५/२००१ मधील तरतुदीनुसार महिलांसाठी आरक्षण लागू असेल.

१८) महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र. महिआ २०२३/प्र.क्र.२२३/कार्या-२ दि. ४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. तसेच, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Thane Kotwal Bharti 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.