📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) - बॅकलग | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) किंवा केंद्र सरकारमान्य समकक्षी अर्हता. (अतिम अंतिम वर्षातील विद्यार्थीही पात्र) | 1538 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
महत्त्वाचे तपशील एका नजरेत (Quick Highlights) SBI Junior Associate Bharti 2026
-
एकूण जागा (Total Vacancies): १५३८ जागा
-
नौकरीचे ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत (विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश, महाराष्ट्रासाठी – मुंबई/महाराष्ट्र)
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply Online): २७ ऑगस्ट २०२६
-
प्रारंभिक परीक्षा दिनांक (Tentative Exam Date – Preliminary): सप्टेंबर २०२६
-
मुख्य परीक्षा दिनांक (Tentative Exam Date – Main): ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२६
-
परीक्षा शुल्क (Application Fee): SC/ST/PwBD/XS/DXS उमेदवारांसाठी फी नाही (Nil), तर OBC उमेदवारांसाठी ₹७५०/-
-
अधिकृत संकेतस्थळ (Official Website):
[https://sbi.bank.in/web/careers/current-openings](https://sbi.bank.in/web/careers/current-openings)SBI Junior Associate Bharti 2026
पदसंख्या, शिक्षण व वयोमर्यादा तपशील (Vacancy, Education & Age Table)
| पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा (Vacancies) | आवश्यक शिक्षण (Education Qualification) | वयोमर्यादा (Age Limit – As on 01.04.2026) | परीक्षा शुल्क (Fee) |
| ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) – बॅकलग |
१५३८ |
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) किंवा केंद्र सरकारमान्य समकक्षी अर्हता. (अतिम अंतिम वर्षातील विद्यार्थीही पात्र) |
२० ते २८ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९८ ते १ एप्रिल २००६ दरम्यान असावा; नियमांनुसार SC/ST/OBC उमेदवारांना वयात सवलत) |
SC/ST/PwBD साठी: फी नाही
OBC साठी: ₹७५०/-
|
प्रवर्गनिहाय व राज्यनिहाय जागांचा तपशील (State-wise Vacancy Breakdown)
-
कर्नाटक (Bengaluru): १२० जागा
-
मध्य प्रदेश व छत्तीसगड (Bhopal): १६० जागा
-
ओडिशा (Bhubaneswar): १११ जागा
-
चंदीगड युटी: २२ जागा
-
जम्मू आणि काश्मीर युटी: ४२ जागा
-
हिमाचल प्रदेश: ११ जागा
-
पंजाब: १८ जागा
-
तमिळनाडू (Chennai): ६५ जागा
-
तेलंगणा (Hyderabad): ३२ जागा
-
राजस्थान (Jaipur): १०६ जागा
-
पश्चिम बंगाल (Kolkata): ५५ जागा
-
उत्तर प्रदेश (Lucknow): ३१ जागा
-
महाराष्ट्र / मुंबई मेट्रो (Maharashtra): १६५ जागा
-
दिल्ली (New Delhi): १७ जागा
-
गुजरात (Gandhinagar): २८९ जागा
-
आसाम (Guwahati): ३९ जागा
-
त्रिपुरा: २२ जागा
-
बिहार (Patna): १२ जागा
-
झारखंड (Patna): १३३ जागा
निवड प्रक्रिया (Selection Procedure)
-
फेस-१: प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam): १०० गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा (इंग्रजी भाषा, न्यूमेरिकल अबिलिटी आणि रीजनिंग अबिलिटी). प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ असणार आहे.
-
फेस-२: मुख्य परीक्षा (Main Exam): २०० गुणांची मुख्य परीक्षा (जनरल/फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अप्तिट्यूड, आणि रिझनिंग अँड कॉम्प्युटर अप्तिट्यूड).
-
फेस-३: स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (Local Language Test): ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वी मध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) शिकलेली नाही, त्यांची भाषा चाचणी घेतली जाईल.
SBI Junior Associate Bharti 2026
सामान्य माहिती व महत्त्वाच्या सूचना (General Information & Instructions)
-
पात्रता तपासून घेणे: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेली पात्रता आणि इतर निकष पूर्ण करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
-
अर्जाचे स्वरूप: उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात आणि पूर्णपणे व्यवस्थित भरलेला असावा याची काळजी घ्यावी.
-
प्रत जतन करणे: ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी सिस्टीम-जनरेटेड अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.
-
पात्रता पडताळणी: अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे बँकेतर्फे सर्व उमेदवारांना प्रवेश दिला जाईल, परंतु पात्रतेची मूळ कागदपत्रे आणि वयाची पडताळणी केवळ नोकरीत रुजू होताना (at the time of joining) केली जाईल.
-
बदलाबाबत सवलत नाही: एकदा सबमिट केलेल्या अर्जामध्ये (प्रवर्गासह) कोणत्याही बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही. अर्ज काळजीपूर्वक भरावा.
-
वेळेवर अर्ज करणे: इंटरनेटवरील संभाव्य तांत्रिक अडचणी किंवा शेवटच्या दिवसाबद्दलची गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे फायद्याचे ठरेल.
-
एकापेक्षा जास्त अर्ज: उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत. एकापेक्षा जास्त अर्ज झाल्यास केवळ शेवटचा यशस्वी अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि इतर अर्जांचे शुल्क जप्त केले जाईल.
-
प्रारंभिक परीक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter): परीक्षेच्या केंद्रावर प्रारंभिक परीक्षेचे प्रवेशपत्र जमा केले जाणार नाही. उमेदवारांनी ते स्वतःकडे सुरक्षित ठेवावे, कारण मुख्य परीक्षेच्या वेळी मुख्य प्रवेशपत्रासोबत याची आवश्यकता असेल.
-
नोकरीत असलेल्या उमेदवारांसाठी (NOC/Discharge): शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या वेळी योग्य ते ‘डिस्चार्ज प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल.
-
जात प्रमाणपत्र: SC/ST उमेदवारांना भारत सरकारच्या नियमानुसार विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र रुजू होताना सादर करावे लागेल.
-
OBC नॉन-क्रिमीलेयर घोषणा: OBC प्रवर्गांतर्गत आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना, ते नॉन-क्रिमीलेयर अंतर्गत येत असल्याबाबतचे घोषणापत्र आणि प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
-
वैद्यकीय चाचणी व KYE: निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वैद्यकीय फिटनेस आणि ‘KYE’ (Know Your Employee) औपचारिकता पूर्ण करण्याच्या अधीन असेल.
-
अंतिम अधिकार: परीक्षा आणि निवड प्रक्रियेबाबत बँकेचा निर्णय सर्व उमेदवारांवर बंधनकारक राहील.
-
विपणन कार्य (Marketing & Fieldwork): नवीन भर्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना बँकेच्या अंतर्गत आणि बाहेरील ग्राहकांशी संपर्क साधणे, बँकिंग सेवा, सल्लागार सेवा आणि उत्पादनांची विक्री (Cross-selling) करण्याचे काम करावे लागेल. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेर प्रवास करावा लागू शकतो तसेच कामाच्या वेळा लवचिक व शिफ्टनुसार असू शकतात.
-
कायदेशीर क्षेत्र: या जाहिरातीसंदर्भातील कोणतीही कायदेशीर कारवाई केवळ मुंबई येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रांतर्गत करता येईल.
महत्त्वाच्या सूचना (Summary of Important Instructions)
-
ऑनलाइन अर्ज: अर्जाची प्रक्रिया केवळ ऑनलाइन माध्यमातून पूर्ण होईल. फी भरल्याशिवाय नोंदणी पूर्ण मानली जाणार नाही. अर्जाची कोणतीही हार्ड कॉपी बँकेला पाठवू नका.
-
अर्जातील माहिती: अर्जात दिलेली सर्व माहिती अचूक असावी. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही.
-
संपर्क माहिती: निकाल जाहीर होईपर्यंत तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या सूचना, कॉल लेटर आणि मुलाखतीची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल.
-
[Aadhaar Redacted] कार्ड: उमेदवारांकडे वैध [Aadhaar Redacted] कार्ड असणे आवश्यक आहे, कारण भरतीच्या विविध टप्प्यांवर ऑनलाइन पडताळणी केली जाईल.
-
उमेदवारीची पडताळणी: मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे (शैक्षणिक, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ.) सादर करणे अनिवार्य आहे. मूळ कागदपत्रे नसल्यास उमेदवाराला मुलाखतीला बसू दिले जाणार नाही.
-
कर्ज/CIBIL निकष: ज्या उमेदवारांचे कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते थकलेले आहेत (defaulted), ते या पदासाठी अपात्र आहेत. जॉइनिंगच्या तारखेपर्यंत सर्व थकबाकी भरलेली असावी.
-
आरक्षण आणि प्रमाणपत्रे:
-
OBC, SC, ST, EWS आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील (Govt of India format) वैध प्रमाणपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
-
OBC (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र १ एप्रिल २०२६ रोजी किंवा त्यानंतरचे असावे.
-
-
गैरवर्तन: परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल आणि भविष्यातील परीक्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते.
-
नियुक्ती आणि ट्रेनिंग: निवड झालेल्या उमेदवारांना ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ म्हणून नियुक्त केले जाईल. त्यांना २ वर्षांच्या प्रोबेशन कालावधीतून जावे लागेल आणि ३ वर्षांच्या सेवेचा २ लाखांचा बाँड (Bond) लिहून द्यावा लागेल.
-
परीक्षा केंद्र: परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेच्या आधी पोहोचणे अनिवार्य आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जाईल.
-
इतर: निवड प्रक्रियेबाबत कोणताही वाद असल्यास मुंबई न्यायालयाचे अधिकार क्षेत्र अंतिम राहील.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

SBI Junior Associate Backlog Recruitment 2026 : भारतीय स्टेट बँक JA ( च्या १५३८ बॅकलग जागांसाठी भरती जाहीर.