📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| शिपाई (Peon) | (इ. १२ वी) उत्तीर्ण किंवा १२ वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा. तसेच पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षे मूळ रहिवासी असावा. | 289 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
Pune District Central Cooperative Bank Limited Recruitment 2026:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये भरती
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):Pune DCC Bank Bharti
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०४ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० वाजता)
-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
-
परीक्षा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल.
पद व भरती तपशील (Vacancy & Details Table):
| तपशील | माहिती |
| पदाचे नाव (Post Name) |
शिपाई (Peon) |
| एकूण जागा (Total Vacancies) |
२८९ जागा
|
| शैक्षणिक पात्रता (Education) |
उमेदवार किमान उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) उत्तीर्ण किंवा १२ वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा. तसेच पुणे जिल्ह्याचा किमान १५ वर्षे मूळ रहिवासी असावा. |
| वयोमर्यादा (Age Limit) |
१८ ते ३८ वर्षे (दि. ०१/०८/२०२६ रोजी Sरोजी गृहीत). नियमानुसार वयात सवलत लागू. |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) |
पुणे, महाराष्ट्र. |
| अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन (Online). |
| परीक्षा शुल्क (Application Fee) |
रु. १६५०/- (अधिक १८% जीएसटी व सर्व्हिस चार्ज). |
| मासिक वेतन (Salary) |
परिविक्षाधीन कालावधीत दरमहा रु. १२,०००/- एकवट पगार. |
Pune DCC Bank Bharti
टीप व अटी:
-
अर्ज करताना उमेदवारांनी आपले मूळ रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate – 2018 नंतरचे) आणि आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे.
-
सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत https://www.pdcc.bank.in/careers किंवा https://www.punedccbank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची कार्य पद्धती
-
अडचणींचे निराकरण: ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी help@punedccbank.com या ईमेलवर किंवा ८७९३६७५९०४ या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. ही हेल्पलाइन सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
परीक्षा शुल्क भरण्याची माहिती (Application Fee Payment)
१. शुल्क पद्धत: लेखी परीक्षा शुल्काची रक्कम फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाईल. २. पर्याय: UPI, डेबिट कार्ड (Rupay/Visa/Master Card/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट (Gpay, Phone Pe, Bhim App इ.) द्वारे शुल्क भरता येईल. ३. ई-पावती (E-Receipt): परीक्षा शुल्क यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर ई-पावती तयार होईल, ज्यावरून व्यवहार पूर्ण झाल्याचे समजावे. उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या अर्जाची प्रत प्रिंट करून घेणे आवश्यक आहे. ४. अंतिम तारीख: शुल्काचा भरणा अंतिम तारखेपर्यंत सुरू राहील. केवळ शुल्क भरलेले उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र ठरतील.
अर्ज कसा करावा आणि कागदपत्रे कशी अपलोड करावीत?
-
नोंदणी प्रक्रिया: उमेदवारांनी प्रथम संकेतस्थळावरील सविस्तर सूचना वाचून (NEW REGISTRATION) या ऑनलाइन बटनावर क्लिक करावे. अर्ज पूर्ण भरल्यानंतर शुल्क भरून अर्ज व पावती पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जतन करून ठेवावी.
-
फोटो आणि स्वाक्षरी साईज:
-
फोटो: ३.५ सेमी × ४.५ सेमी आकार, JPG/JPEG फॉरमॅट, साईज २० KB ते ५० KB.
-
स्वाक्षरी: पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने केलेली सही, १.५ सेमी × ३.५ सेमी आकार, JPG/JPEG फॉरमॅट, साईज १० KB ते २० KB.
-
-
प्रमाणपत्रे अपलोड करणे: उमेदवाराने स्वतःचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आणि [[Aadhaar Redacted]] “JPG/JPEG” फॉरमॅटमध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे, ज्याची साईज २० KB ते ५० KB असावी.
-
लिंक बंद होणे: अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याच्या अंतिम तारखेनंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
प्रवेश पत्र व इतर सूचना
-
लेखी परीक्षेची माहिती ईमेल/एसएमएसद्वारे दिली जाईल. प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र व बैठक क्रमांकाची माहिती बँकेच्या https://www.pdcc.bank.in/careers आणि https://www.punedccbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, जी पोस्टाने पाठवली जाणार नाही.
-
उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपला रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक जतन करून ठेवावा.
Pune DCC Bank Bharti
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (PDCC Bank) शिपाई भरतीसाठीच्या उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:
महत्त्वाच्या सूचना (Important Instructions for Candidates)
६.१. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती किंवा जोडलेली कागदपत्रे खोटी, बनावट अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
६.२. उमेदवारांनी भरती प्रक्रियेकामी कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस/दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सदर उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
६.३. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल.
६.४. उमेदवारांना लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
६.५. यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी (ऑनलाइन, ई-मेल, टपाल व हस्ते पोहोच) अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यांना भरती प्रक्रियेकरिता नव्याने ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
६.६. भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो स्थानिक वर्तमानपत्रात/बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरूपात कळविले जाणार नाही.
६.७. उमेदवाराचा पुणे जिल्हयातील किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील मूळ रहिवासी असलेबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. (सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र – Domicile Certificate).
६.८. उमेदवाराची लेखी परीक्षा प्रामुख्याने पुणे शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. मात्र आवश्यकतेनुसार जिल्हयातील इतर केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल. तसेच उमेदवारांची संख्या विचारात घेऊन परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेण्यात येईल.
६.९. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
६.१०. बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची/युट्यूब चॅनेल/टेलिग्राम चॅनेल यांची नियुक्ती केलेली नाही. याबाबत कोणतीही जाहिरात अगर माहिती ही बेकायदेशीर आहे, असे समजण्यात यावे.
६.११. काही अपरिहार्य/आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगित करणे/पुढे ढकलणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस असतील.
६.१२. भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद/तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
६.१३. सदर भरती प्रक्रिये अंतर्गत शासनाकडील वेळोवेळीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे.
६.१४. सदर भरती प्रक्रियेबाबत काही वाद उद्भवल्यास त्याचे अधिकारक्षेत्र केवळ पुणे न्यायालय (Pune Jurisdiction) हेच राहील.
Pune DCC Bank Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
Pune DCC Bank Bharti

Pune DCC Bank: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती २०२६