Job Icon

MPSC गट-ब भरती 2026: 552 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती वाचा

MPSC गट-ब भरती 2026: 552 रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर!

MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ५५२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

खाली या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.

📌 भरतीचा संपूर्ण तपशील
📅 अर्ज सुरू:१० एप्रिल 2026 (दुपारी 2:00 पासून) ते 30 एप्रिल 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
📅 शेवट तारीख:2026.04.30
📍 नोकरी ठिकाण:All Maharashtra
🎓 शिक्षण पात्रता:i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवारही पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत, मात्र मुख्य परीक्षेच्या अर्जापर्यंत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. /मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
🏢 अनुभव:आवश्यक नाही
🔢 एकूण जागा:552
💰 परीक्षा फी:(1) अमागास (Gen): ₹394/- (2) मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग: ₹294/-
📏 वयोमर्यादा:[As on 01-08-2026 ] (i) अमागास: 18,19 To 31,38Y (ii) मागासवर्गीय/अनाथ/EWS: 18,19 To 34,43Yrs
📝 परीक्षा तारीख:पूर्व परीक्षेचा दिनांक: 14 जून 2026 (रविवार)
पदशिक्षणजागा
सहायक कक्ष अधिकारी (ASO)कोणत्याही शाखेतील पदवी. 06
राज्य कर निरीक्षक (STI)कोणत्याही शाखेतील पदवी. 236
पोलीस उपनिरीक्षक (PSI)कोणत्याही शाखेतील पदवी. 310
📏 आपले वय तपासा (Age Calculator)
जन्मतारीख निवडा:
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ:
लोड होत आहे...

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा.

📄 PDF जाहिरात ✅ ऑनलाईन अर्ज 🌐 अधिकृत वेबसाईट
📸 फोटो / सही रिसायझर

W (px)
H (px)
KB
📢 जादा माहिती / महत्त्वाच्या सूचना:
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न: पूर्व परीक्षा कुठे घेतली जाईल?
उत्तर: ही परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल.

प्रश्न: PSI पदासाठी शारीरिक चाचणीचे गुण मेरिटमध्ये धरले जातात का?
उत्तर: नाही, शारीरिक चाचणी केवळ 'अर्हताकारी' (Qualifying) आहे. मुलाखतीस पात्र होण्यासाठी ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे
Follow Us: Instagram | Telegram
www.laduli.in

हे पण वाचा: फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

📌 भरतीचा संक्षिप्त तपशील (MPSC Notification Highlights)

  • आयोग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
  • परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६
  • एकूण जागा: ५५२ पदे
  • पूर्व परीक्षेचा दिनांक: १४ जून २०२६ (रविवार)
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

📊 रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील

या जाहिरातीनुसार खालील तीन महत्त्वाच्या संवर्गातील पदे भरली जाणार आहेत:

अ.क्र.संवर्गाचे नावएकूण पदे
सहायक कक्ष अधिकारी (ASO)

०६ पदे

राज्य कर निरीक्षक (STI)

२३६ पदे

पोलीस उपनिरीक्षक (PSI)

३१० पदे

एकूण५५२ पदे

🎓 पात्रता आणि अर्हता (Eligibility Criteria)

१. शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

  • पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवारही पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत, मात्र मुख्य परीक्षेच्या अर्जापर्यंत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

२. वयोमर्यादा (१ ऑगस्ट २०२६ रोजी):

  • किमान वय: १८ ते १९ वर्षे (संवर्गानुसार).

    कमाल वय (अमागास): ३१ ते ३८ वर्षे.

    कमाल वय (मागासवर्गीय/अनाथ/EWS): ३४ ते ४३ वर्षे.

    (टीप: दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत आहे.)


तुम्हाला टायपिंगचा सराव करायचा असेल, तर लिंकवर क्लिक करा: 👉 फ्री टायपिंग सराव आणि टेस्ट – इथे क्लिक करा


 

३. शारीरिक पात्रता (PSI पदासाठी):

केवळ पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी खालील शारीरिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • पुरुष: उंची १६५ सेमी (अनवाणी) आणि छाती न फुगवता ७९ सेमी (५ सेमी फुगवण्याची क्षमता).

    महिला: उंची १५७ सेमी (अनवाणी).


📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तपशीलदिनांक
ऑनलाईन अर्ज सुरू

१० एप्रिल २०२६ (दुपारी २:०० पासून)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

३० एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)

शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

३० एप्रिल २०२६

पूर्व परीक्षेचा दिनांक

१४ जून २०२६


💰 परीक्षा शुल्क (Application Fees)

  • अमागास (Open): ₹३९४/-

    मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग: ₹२९४/-


✅ निवड प्रक्रिया (Selection Process)

१. संयुक्त पूर्व परीक्षा: १०० गुण (सर्व संवर्गासाठी सामाईक).

२. मुख्य परीक्षा: ४०० गुण. ३. शारीरिक चाचणी आणि मुलाखत: केवळ PSI पदासाठी (शारीरिक चाचणी ७० गुणांची आणि मुलाखत ४० गुणांची).


❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न: पूर्व परीक्षा कुठे घेतली जाईल? उत्तर: ही परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल.

प्रश्न: PSI पदासाठी शारीरिक चाचणीचे गुण मेरिटमध्ये धरले जातात का? उत्तर: नाही, शारीरिक चाचणी केवळ ‘अर्हताकारी’ (Qualifying) आहे. मुलाखतीस पात्र होण्यासाठी ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

प्रश्न: या परीक्षेसाठी अर्ज कुठे करावा? उत्तर: उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर https://mpsconline.gov.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

प्रश्न: पगार किती असतो? उत्तर: सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ₹४४,९०० – ₹१,४२,४०० आणि इतर पदांसाठी ₹३८,६०० – ₹१,२२,८०० (अधिक भत्ते) ही वेतनश्रेणी आहे.

हे पण वाचा: CRPF मेगा भरती 2026: 9195 रिक्त जागांसाठी १० वी पास उमेदवारांना संधी!


सूचना: अधिकृत जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी mpsc.gov.in ला भेट द्या. सरकारी नोकरीच्या अशाच अपडेट्ससाठी दररोज Laduli.in (लाडुली नोकरी सर्च पोर्टल) ला भेट द्या.