📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
MPSC Recruitment 2026: सहाय्यक संचालक आणि माहिती अधिकारी पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर!
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील ‘सहाय्यक संचालक (माहिती), अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने’ तसेच ‘माहिती अधिकारी, गट-ब’ या पदांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. MPSC Assistant Director Merit List 2026
महत्त्वाचे तपशील:
-
पद: सहाय्यक संचालक (माहिती), अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने / माहिती अधिकारी, गट-ब.
-
जाहिरात क्रमांक: १३१/२०२२.
-
मुलाखत प्रक्रिया: या पदांसाठी मुलाखती २ आणि ३ जून २०२६ रोजी पार पडल्या होत्या.
महत्त्वाच्या सूचना: १. न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन: ही गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर) येथे दाखल असलेल्या विविध न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. २. तात्पुरते स्वरूप: ही गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ३. कागदपत्रे पडताळणी: अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेनंतर उमेदवारांच्या दाव्यांमध्ये किंवा शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे गुणवत्ताक्रम बदलू शकतो किंवा काही उमेदवार अपात्रही ठरू शकतात, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
उमेदवारांनी अधिकृत निकाल आणि गुणवत्ता यादी तपासण्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला (https://mpsc.gov.in) भेट द्यावी.
MPSC Assistant Director Merit List 2026 Laduli

MPSC निकाल अपडेट – सहाय्यक संचालक आणि माहिती अधिकारी पदाची गुणवत्ता यादी जाहीर!