New भरती
अर्ज सुरू आहे
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., (अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा:) Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 25-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 15-09-2026 17:00
📍 नोकरी ठिकाण: लातूर जिल्हा
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 640
💰 परीक्षा फी: ₹५००/- (स्वतःच्या बँक खात्याद्वारे ऑनलाईन QR Code द्वारे भरणा)
📏 वयोमर्यादा: किमान १८ वर्षे पूर्ण
📝 परीक्षा तारीख: परीक्षा नाही; गुणांकन आणि मुलाखतीच्या आधारे निवड प्रक्रिया

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
अहमदपूर तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.69
औसा तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.92
चाकूर तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.62
देवणी तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.37
जळकोट तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.21
लातूर तालुका (ग्रामीण)(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.92
निलंगा तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.89
रेणापुर तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.45
शिरुर अनंतपाळ तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.28
उदगीर तालुका(HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील./स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.64
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ भरती २०२६ – संपूर्ण माहिती

महत्त्वाचे तपशील (Quick Overview) Latur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026

तपशीलमाहिती
लातूर जिल्हा आपले सरकार सेवा केंद्र भरती २०२६ (Latur Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026)
एकूण जागा (Total Vacancies)

६४० रिक्त जागा (ग्रामपंचायत, नगर परिषद व महानगरपालिका क्षेत्र मिळून)

शैक्षणिक पात्रता (Education)

किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण व संगणकाचे मूलभूत ज्ञान (MSCIT/CCC प्राधान्य)

वयोमर्यादा (Age Limit)

किमान १८ वर्षे पूर्ण

नोकरीचे ठिकाण (Job Location)

लातूर जिल्हा (विविध ग्रामपंचायती, नगर परिषदा व लातूर महानगरपालिका क्षेत्र)

अर्ज शुल्क (Application Fee)

₹५००/- (स्वतःच्या बँक खात्याद्वारे ऑनलाईन QR Code द्वारे भरणा)

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ (Post URL)

setusamitilatur.in / latur.gov.in

अर्ज सुरू होण्याची तारीख

२५ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० वाजल्यापासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ०५:०० पर्यंत)

परीक्षा दिनांक (Exam Date)

परीक्षा नाही; गुणांकन आणि मुलाखतीच्या आधारे निवड प्रक्रिया

माहिती पोस्ट (Blog Post Content)

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय (ई-गव्हर्नन्स विभाग) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील विविध तालुके, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी नवीन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

१. शैक्षणिक पात्रता व अटी:

  • वयाची अट: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.

  • शिक्षण: किमान उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (HSC / १२ वी) उत्तीर्ण असावे.

  • संगणक ज्ञान: संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक असून MSCIT किंवा CCC प्रमाणपत्रास प्राधान्य राहील.

  • स्थानिक रहिवासी: अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.

  • इतर कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि स्वतःचे किंवा भाड्याचे किमान १०० चौ.फुटाचे स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक आहे.

२. निवड प्रक्रिया (Selection Process):

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्जांची छाननी, पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष तपासणी आणि १०० गुणांच्या गुणांकनावर आधारित मुलाखत घेऊन अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल:

  • शैक्षणिक पात्रता: १० गुण

  • संगणक व डिजिटल साक्षरता: १५ गुण

  • पायाभूत सुविधा (Office & Equipment): १५ गुण

  • आर्थिक क्षमता: १० गुण

  • ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत): २० गुण

  • अनुभव: १० गुण

  • व्यवसाय आराखडा: ०५ गुण

  • सामाजिक समावेशकता: ०५ गुण

  • चारित्र्य पडताळणी (पोलिस वेरिफिकेशन): १० गुण

 

Latur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026


अटी व शर्ती :-

१. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतचे १) शासन निर्णय क्र. मातंस-१७१६/प्र. क्र. ५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८, २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८४/माते (३९) सामान्य प्रशासन विभाग दिनांक २७ मार्च २०२५ ३) इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, यांचे शासन निर्णय क्र. आसेकें-२०२६/प्र.क्र. ९८/TECH-१ (इ-१७४२६६६) दिनांक ०९ जुलै २०२६ च्या शासन निर्णयाला अधिन राहुन आपले सरकार केंद्राचे वाटप व केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णय मधील अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदारास अनिवार्य राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र रद्द करण्यात येईल.

२. अर्जदार हा गुंतवणूक दृष्टिकोनातून सक्षम असावा. आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान ६ ते १२ महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता असावी.

३. अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा. (ग्रामपंचायत क्षेत्राकरिता संपूर्ण ग्रामपंचायत भौगोलिक घटक, नगर परिषद व नगरपंचायत साठी संपूर्ण नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्र भौगोलिक घटक महानगरपालिका क्षेत्रासाठी म्हणून ग्राह्य धरण्यात येईल).

४. अर्जदाराकडे स्वतःचे किंवा भाड्याचे किमान १०० चौफुटाचे स्वतंत्र कार्यालय असावे.

५. अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

६. शासन निर्णय दि.१९ जानेवारी २०१८, दि. २७ मार्च २०२५ नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर तसेच केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.

७. अर्जदाराकडे स्वतःचे किमान २ संगणक/लॅपटॉप, १ स्कॅनर, १ लेझर प्रिंटर, बायोमॅट्रिक उपकरण, वेबकॅम, यूपीएस अथवा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड व इंटरनेट (ग्रामीण १० mbps व नागरी २० mbps), सीसीटीव्ही, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष.

८. आपले सरकार सेवा केंद्राकरिता पायाभूत सुविधेसह आपले सरकार सेवा केंद्राची आज्ञावली उत्तम रित्या हाताळाण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे.

९. शासनाने पुरवलेल्या आज्ञावली इ. चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे, आवेदकांना बंधनकारक राहील.

१०. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अधिसूचित ठिकाणी चालवणे क्रम प्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करण्यात येईल.

११. एका उमेदवारास जिल्ह्याममध्ये (शहरी/ग्रामीण) भागात कोणत्याही एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. दुबार अर्ज केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

१२. तसेच यापूर्वी ज्यांच्याकडे स्वतः किंवा कुटुंबात आधी पासून जिल्हा परिषद विभागाचा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू असेल त्याचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. कुटुंबातील एकच व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यास पात्र राहील. (कुटुंब म्हणजे पती, पत्नी व अविवाहीत मुले/मुली)

१३. आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी दिलेली माहिती किंवा इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये जर चुकीची/खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येऊन अपात्र ठरवण्यात येईल व निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल.

१४. अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा, अर्जदाराने अर्ज करताना दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल, यासंदर्भात पोलीस विभागाचा अभिप्राय अंतिम समजून निर्णय घेतला जाईल.

१५. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी वेळोवेोली दिलेल्या आदेशांचे/ निर्देशांचे पालन करावे लागेल, तसेच त्यांनी केंद्राबाबत मागितलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील.

१६. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर सलग ३ महिन्याच्या कालावधीमध्ये एकही व्यवहार केला नसल्यास सदर केंद्र कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा केंद्र चालू होणार नाही.

१७. केंद्रामधून निर्गत केलेल्या प्रमाणपत्र/दाखल्याच्या स्थळप्रती सबंधित तहसिल/उपविभागीय कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.

१८. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून विहित शुल्कात देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच अभिप्राय कक्षाकडून केंद्र चालकाच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

१९. शासनाचे साहित्य प्राप्त झाल्यावर त्याचे काटकसरीने वापर करून संरक्षण व जतन करावे लागेल, तरोच डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्यावे लागेल.

२०. अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

२१. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्ती केलेले तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी करू शकतील.

२२. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, यांचे शासन निर्णय क्र. आसेकें-२०२६/प्र.क्र. ९८/TECH-१ (इ-१७४२६६६) दिनांक ०९ जुलै २०२६ नुसार गुणांकन प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा सेतू समितीचा निर्णय अंतिम राहील.

२३. मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी वेळोवेोळी दिलेल्या सुचना/निर्देश/आदेश यांचे पालन करणे बंधनकारक राहील.

२४. केंद्र व राज्य शासनाचे / निगमशासकीय/ सार्वजनिक उपक्रमे/महामंडळे/स्थानीय स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत सदस्य,सरपंच यांना तसेच शासकीय सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करता येणार नाही. (आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज प्रक्रियेत ग्रामपंचायत मधील रूजू असलेले केंद्र चालक या प्रक्रियेसाठी अपात्र असतील)

२५. ज्या केंद्र चालकांवर यापूर्वी लातूर जिल्हा/तालुका प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असेल अशा केंद्र चालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेवटची एक संधी म्हणून या जाहिरातीमध्ये त्यांना अर्ज करता येईल व या जाहिरातीमधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील, मात्र ज्या केंद्रचालकावर प्रशासनामार्फत फौजदारी कार्यवाही प्रस्तावीत आहे किंवा करण्यात आलेली आहे, त्यांचा विचार करण्यात येणार नाही.

२६. अंतिम पात्र झालेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र १ महिन्यात सुरू करणे बंधनकारक राहील. (शासन नियमानुसार केंद्र स्थापन करण्याबाबत जि.पी.एस. एनॅबल्ड फोटो सादर करणे बंधनकारक राहील)

२७. आपले सरकार सेवा केंद्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, लातूर यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील, याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.

२८. अर्जदाराने आपले सरकार सेवा केंद्र वाटपासंदर्भातील कोणत्याही प्रकारची शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरविण्यात येईल.

२९. जाहिरात प्रसिद्ध करणे, स्थगित करणे, जाहिरातीमध्ये दुरुस्ती, संपूर्ण प्रक्रिया रद्द करणे, किंवा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांना राहील.

३०. अर्जदारास कोणत्याही प्रक्रियेबाबत वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. लातूर जिल्ह्यातील उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व माहिती वेळोवेळी जिल्ह्याचे संकेतस्थळ https://latur.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात येईल, या करीता या कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.

३१. अर्जदार यांना आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाचे शुल्क रू. ५००/- प्रमाणे ऑनलाईन फॉर्म जमा करतेवेळी शुल्क स्वतःच्या बँक खात्याद्वारे QR Code दवारे पेमेंट करून त्याची पावती/Receipt जोडणे अनिवार्य राहील.

३२. मुलाखतीवेळी उदेद्वार गैरहजर राहिल्यास संबंधितांचा अर्ज अपात्र करण्यात येईल.

Latur Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.