⚠️ जुनी जाहिरात (History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 07-07-2026
🗓️ शेवटची तारीख: 18-07-2026 05:25
📍 नोकरी ठिकाण: Jalna महाराष्ट्र
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 70
💰 परीक्षा फी: (i) अमागास Gen: 1000/-रुपये (ii) मागासवर्गीय: 800 रुपये. (iii) माजी सैनिक (गट-क संवर्ग): शुल्क माफ आहे
📏 वयोमर्यादा: [As on 01-04-2026] (i) खुला प्रवर्ग : 21 To 45,38 (ii) राखीव प्रवर्ग: 21 To 45,43Yrs
📝 परीक्षा तारीख: Update नंतर दिला जाईल

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
उपव्यवस्थापकवाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post-Graduate), किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.1
सहाय्यक व्यवस्थापकवाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post-Graduate), किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.1
बँकिंग ऑफिसर नं. १वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post-Graduate), किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.2
बँकिंग ऑफिसर नं. २कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (५०% गुणांसह) आवश्यक.11
कारकुन / लिपीककोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक55
🔴 या बॅचची मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२६

Jalna DCC Bank Bharti 2026: दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जालना अंतर्गत विविध संवर्गातील ७० रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती IBPS च्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेऊन केली जाणार आहे.

भरतीचा तपशील:

  • एकूण जागा: ७० पदे.

  • शिक्षण पात्रता: (संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात पहा).

  • वयोमर्यादा: (अधिकृत नियमांनुसार).

  • अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाइन (प्रत्यक्ष किंवा पोस्टाने आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत).

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०७ जुलै २०२६.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२६.

  • नौकरीचे ठिकाण: जालना.

  • परीक्षा: IBPS द्वारे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती – पद तपशील

अ.क्र. पदाचे नाव एकूण पदे वयोमर्यादा (खुला प्रवर्ग) वयोमर्यादा (राखीव प्रवर्ग)
उपव्यवस्थापक ०१ २१ ते ४५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक ०१ २१ ते ४० वर्षे
बँकिंग ऑफिसर नं. १ ०२ २१ ते ४० वर्षे २१ ते ४५ वर्षे
बँकिंग ऑफिसर नं. २ ११ २१ ते ३८ वर्षे २१ ते ४३ वर्षे
कारकुन / लिपीक ५५ २१ ते ३८ वर्षे २१ ते ४३ वर्षे

१. शैक्षणिक पात्रता (Education):

  • उपव्यवस्थापक: वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post-Graduate), किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.

  • सहाय्यक व्यवस्थापक: वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.

  • बँकिंग ऑफिसर नं. १: वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, किंवा CA / MBA फायनान्स / M.Sc कॉम्प्युटर (५०% गुणांसह) आवश्यक.

  • बँकिंग ऑफिसर नं. २: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (५०% गुणांसह) आवश्यक.

  • कारकुन / लिपीक: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक.

  • विशेष टीप: सर्व पदांसाठी MS-CIT किंवा तत्सम शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अनुभवी उमेदवारांना (विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनुभवास) प्राधान्य दिले जाईल.

२. परीक्षा शुल्क (Fee):

  • खुला (अराखीव) प्रवर्ग: १०००/- रुपये (GST सहित).

  • मागासवर्गीय (राखीव) प्रवर्ग: ८००/- रुपये (GST सहित).

  • माजी सैनिक / दिव्यांग उमेदवार: शुल्क माफ आहे.

  • टीप: परीक्षा शुल्क हे ना-परतावा (Non-refundable) आहे.

३. परीक्षा दिनांक (Exam Date):

  • ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर (https://jalnadcc.bank.in/advertisement.php) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

  • परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) परीक्षेच्या ७ ते १० दिवस आधी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

महत्त्वाची तारीख:

  • ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८/०७/२०२६ आहे.


Jalna DCC Bank Bharti 2026


महत्वाच्या लिंक्स:

  • अधिकृत वेबसाइट: https://jalnadcc.bank.in

  • ऑनलाइन अर्ज लिंक: [ – ०७/०७/२०२६ पासून उपलब्ध होईल]


Laduli

५. पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी:

१. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशत: बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार बँकेस आहेत व सदरील बदल उमेदवारांना बंधनकारक असतील.

२. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, दिव्यांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रचलित आदेश/नियम लागू राहतील.

३. महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास, त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असल्याबाबत तसेच नॉन क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. तसेच महिला व बालविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक महिआ २०२३/प्र.क्र. १२३/कार्या-२ दिनांक ०४/०५/२०२३ नुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

४. महिलांकरिता आरक्षित पदावर पात्र महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास, त्या त्या प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवारांचा विचार करण्यात येईल.

५. एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास, तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल, तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

६. समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र. १६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुद्धिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र. ३९/१६-अ दिनांक १९ डिसेंबर २०१८ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

७. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक राआधो-४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या ग्राह्यता कालावधी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, राआधो २०२३/प्र.क्र. ४०/१६-अ दिनांक २३ मार्च २०२३ नुसार समजण्यात येईल.

८. अद्यावत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

९. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.

१०. अराखीव (खुला) उमेदवाराकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकष संदर्भातील अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारासह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारसीकरीता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गा संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

११. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. ‘सर्वसाधारण रहिवासी’ या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अ नुसार जो अर्थ आहे, तोच अर्थ असेल.

१२. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे आणि अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयांमध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

१३. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून, आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.


६. खेळाडू आरक्षण:

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र. ६८/क्रीयुसे-२ दिनांक ०१ जुलै २०१६, तसेच शासन शुद्धिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र. ६८/क्रीयुसे-२ दिनांक १८ ऑगस्ट २०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-१७१६/प्र.क्र. १८/क्रीयुसे-२/ दिनांक ३० जून २०२२ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२. प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत, क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

३. विहित दिनांकास खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत, तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूंसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्यप्राप्त खेळाडू साठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.

४. सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र सादर केले नसल्यास, अथवा सदर प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

५. कागदपत्रे पडताळणीवेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र, तसेच त्याचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत आणि खेळाडू कोणत्या संवर्गातील आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला, तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.

६. एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळी सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.


Jalna DCC Bank Bharti 2026

सूचना:

१. ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्याशिवाय नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

२. अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास १८००२२२३६६ / १८००१०३४५६६ हा हेल्पलाईन क्रमांक आहे. अर्ज भरण्यात अडचण निर्माण झाल्यास https://cgrs.ibps.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व वेबसाईट फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखत पत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्कासाठी आहे.

३. उमेदवाराने अर्ज भरताना स्वतःचा ईमेल-आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.

४. उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करत आहे, त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.

५. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

६. उपरोक्त बाबतीत काही कायदेशीर बाब उद्भवल्यास “जालना” येथील न्यायालयाच्या कक्षेत सोडवण्यात येईल.

१७. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना:

१. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास, त्या उमेदवारांची उमेदवारी / नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.

२. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदासाठीची अर्हता धारण करत आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेस / कागदपत्र पडताळणीस बोलावण्याचा / नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.

३. उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी / अधिकारी यांचेकडून शिफारस / दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अशा उमेदवारास तात्काळ अपात्र घोषित करून त्यांना निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.

४. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे बंधनकारक राहील. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद समजण्यात येईल.

५. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

६. यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदोपत्री किंवा मेलद्वारे अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

७. भरती प्रक्रियेत / निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरूपात कळवले जाणार नाही.

८. उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने जालना शहरातील उपलब्ध केंद्रावर घेण्यात येईल. मात्र, परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार इतर केंद्रांवरही परीक्षा घेतली जाईल. परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल.

९. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

१०. बँकेने सदर ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया IBPS या संस्थेमार्फत राबवली जात आहे. याव्यतिरिक्त भरती प्रक्रिया तसेच परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. यासंदर्भात कोणतीही जाहिरात अगर माहिती ही बेकायदेशीर आहे, असे समजण्यात यावे.

११. काही अपरिहार्य / आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगित करणे / पुढे ढकलणे, अंशत: बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस आहेत.

१२. भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद / तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.

१८. ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत:

१. विविध पदांकरिता बँकेच्या https://jalnadcc.bank.in/advertisement.php या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा / अपूर्ण असल्यास, तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठवण्यात येणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्याचप्रमाणे ई-मेल आयडी व संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

२. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुकी झाल्यास किंवा त्रुटी राहिल्याने भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. तसेच ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. विस्तृत माहितीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इ. बाबतची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.

३. उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे, या परीक्षेत मिळालेल्या फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांची मुलाखत पात्रता निश्चित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेच्या प्राथमिक चाळणीनुसार गुणवत्तेच्या आधारे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.

४. उमेदवारांना एकाच पदासाठी अर्ज दाखल करता येईल.

५. ऑनलाईन अर्ज वेबसाईटवर भरण्याची अंतिम तारीख दिनांक १८/०७/२०२६ असून त्यानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.

६. ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारास ई-मेल / एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती व विविध सूचना या बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहिती पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी भरती प्रक्रियेची अद्यावत माहिती अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारास परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येईल. त्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरताना रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

७. राखीव उमेदवारास दिलेल्या नियुक्ती दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अन्यथा मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास बँकेने दिलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.


(FQ):

  • प्रश्न: अर्ज कोठे करायचे आहेत? उत्तर: अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर https://jalnadcc.bank.in या लिंकवर ऑनलाइन करायचे आहेत.

  • प्रश्न: अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२६ आहे.

  • प्रश्न: परीक्षा कोण घेणार आहे? उत्तर: ही परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

Jalna DCC Bank Bharti 2026


दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जालना (Jalna District Central Cooperative Bank Ltd.) या बँकेबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

बँकेची स्थापना आणि स्वरूप:

  • स्थापना: दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना जिल्ह्याच्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

  • स्वरूप: ही एक सहकारी तत्त्वावर चालणारी बँक असून, ती प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवते.

  • मुख्यालय: मुख्य कार्यालय, संतोषी माता रोड, जालना ४३१ २०३.

बँकेचे कार्यक्षेत्र आणि उद्दिष्टे:

  • कृषी पतपुरवठा: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि इतर शेतीपूरक कर्जांसाठी ही बँक महत्त्वाची भूमिका बजावते.

  • सहकारी संस्थांना सहकार्य: जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देणे हे या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • बँकिंग सेवा: सामान्य ग्राहकांसाठी बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव (FD) आणि इतर आधुनिक बँकिंग सेवा बँक पुरवते.

  • ग्रामीण विकास: ग्रामीण भागात बँकिंगचे जाळे पसरवून आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशनाला (Financial Inclusion) प्रोत्साहन देणे.


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”


Jalna DCC Bank Bharti 2026