🌐
कायदे मंडळ (संसद)
कायदे मंडळ (संसद)
- संसदेची दोन सभागृह असतात.
- लोकसभा ही संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
- राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे
- संसदेच्या सदस्यांना राष्ट्रपतींकडून पद्गृहणाची शपथ दिली आहे.
- राज्यसभा (कलम ८० नुसार)
- हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
- सदस्य पात्रता भारताचा नागरिक असावा वयाची ३० वर्ष पूर्ण असावीत. एकूण सदस्य संख्या – २५०
- विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यामार्फत केली जाते.
- राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही.
- महाराष्ट्रातून राज्यसभेवर १९ सदस्य निवडून दिले जातात.
- राज्यसभेचे सदस्य हे ६ वर्षासाठी निवडून येतात.
- दर दोन वर्षांनी राज्यसभेचे १/३ सभासद निवृत्त होतात.
- उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
- राज्यसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो.
- राज्यसभा सदस्य आपल्या मधून एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
- लोकसभा (कलम ८१)
- लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
- सदस्य पात्रता भारताचा नागरिक असावा. २५ वर्षे पूर्ण असावीत. लोकसभा कार्यकाल ५ वर्षाचा असतो.
- सध्या महाराष्ट्रातून लोकसभेवर ४८ सदस्य निवडले जातात.
- लोकसभेवर निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
- सभापती व सभापती यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
- लोकसभेचे सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे देतात व उपसभापती आपला राजीनामा सभापती कडे देतात.
- लोकसभेची सदस्य संख्या कमाल ५५२ निश्चित करण्यात आलेली आहे.
राष्ट्रपती ( कलम ५२ ते ६२)
- राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक आहे.
- पात्रता – भारताचा नागरिक असावा. लोकसभेवर निवडून येण्याची पात्रता असावी. ३५ वर्ष वय पूर्ण असावे.
- निवड – अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते.
- संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आलेले सदस्य व राज्याचा विधानसभेतील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात.
- विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.
- राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
- राष्ट्रपतीस दरमहा १ लाख ५० हजार वेतन व भत्ते दिले जातात.
- राष्ट्रपतींचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
- राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती कडे देतात.
- कलम ६१ नुसार राष्ट्रपती महाभियोग द्वारे(पदच्युत) पदावरून काढून टाकले जाऊ शकते.
उपराष्ट्रपती (कलम ६३ ते ७१)
- उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
- राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचे काम पाहतात.
- पात्रता – १ भारताचा नागरिक असावा. २. राज्यसभेवर निवडून येण्याची पात्रता असावी. ३. वयाची ३५ वर्षे पूर्ण असावीत.
- उपराष्ट्रपतीला दर महा १,२५,००० रुपये वेतन मिळते.
- भारतीय न्याय व्यवस्था
कायदे मंडळ (संसद)
