🌐

Job Icon

कायदे मंडळ (संसद)

 

कायदे मंडळ (संसद)

 

  • संसदेची दोन सभागृह असतात.
  • लोकसभा ही संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
  • राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे
  • संसदेच्या सदस्यांना राष्ट्रपतींकडून पद्गृहणाची शपथ दिली आहे.
  • राज्यसभा (कलम ८० नुसार)

  • हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
  • सदस्य पात्रता भारताचा नागरिक असावा वयाची ३० वर्ष पूर्ण असावीत. एकूण सदस्य संख्या – २५०
  • विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यामार्फत केली जाते.
  • राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही.
  • महाराष्ट्रातून राज्यसभेवर १९ सदस्य निवडून दिले जातात.
  • राज्यसभेचे सदस्य हे ६ वर्षासाठी निवडून येतात.
  • दर दोन वर्षांनी राज्यसभेचे १/३ सभासद निवृत्त होतात.
  • उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
  • राज्यसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो.
  • राज्यसभा सदस्य आपल्या मधून एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
  • लोकसभा (कलम ८१)
  • लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
  • सदस्य पात्रता भारताचा नागरिक असावा. २५ वर्षे पूर्ण असावीत. लोकसभा कार्यकाल ५ वर्षाचा असतो.
  • सध्या महाराष्ट्रातून लोकसभेवर ४८ सदस्य निवडले जातात.
  • लोकसभेवर निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
  • सभापती व सभापती यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
  • लोकसभेचे सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे देतात व उपसभापती आपला राजीनामा सभापती कडे देतात.
  • लोकसभेची सदस्य संख्या कमाल ५५२ निश्चित करण्यात आलेली आहे.

       राष्ट्रपती ( कलम ५२ ते ६२)

  • राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक आहे.
  • पात्रता  –  भारताचा नागरिक असावा. लोकसभेवर निवडून येण्याची पात्रता असावी. ३५ वर्ष वय पूर्ण असावे.
  • निवड – अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आलेले सदस्य व राज्याचा विधानसभेतील निवडून आलेले  सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात.
  • विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.
  • राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
  • राष्ट्रपतीस दरमहा १ लाख ५० हजार वेतन व भत्ते दिले जातात.
  • राष्ट्रपतींचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
  • राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती कडे देतात.
  • कलम ६१ नुसार राष्ट्रपती महाभियोग द्वारे(पदच्युत) पदावरून काढून टाकले जाऊ शकते.

उपराष्ट्रपती (कलम ६३ ते ७१) 

  • उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
  • राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचे काम पाहतात.
  • पात्रता – १ भारताचा नागरिक असावा. २. राज्यसभेवर निवडून येण्याची पात्रता असावी. ३. वयाची ३५ वर्षे पूर्ण असावीत.
  • उपराष्ट्रपतीला दर महा १,२५,००० रुपये वेतन मिळते.
  • भारतीय न्याय व्यवस्था 

 

कायदे मंडळ (संसद)