📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: पेपर १ आणि २ ची प्रथम उत्तरतालिका जाहीर
MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: पेपर १ आणि २ ची प्रथम उत्तरतालिका जाहीर
MPSC Gazetted Combined Prelims 2026 Answer Key Released : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक ३१ मे, २०२६ रोजी पार पडलेल्या “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६” (जाहिरात क्र. १३२/२०२५) ची प्रथम उत्तरतालिका आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.(Laduli
महत्त्वाच्या तारखा आणि सूचना:
-
परीक्षेचा दिनांक: ३१ मे, २०२६.
-
उत्तरतालिका प्रसिद्धी दिनांक: १ जून, २०२६.
-
हरकती नोंदवण्याचा अंतिम दिनांक: ०६ जून, २०२६.
हरकती कशा नोंदवाव्यात?
उमेदवारांना उत्तरतालिकेबाबत काही आक्षेप किंवा हरकती असल्यास, त्यांनी आयोगाच्या प्रचलित तरतुदींनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीचाच वापर करावा. अन्य कोणत्याही मार्गाने (उदा. टपाल किंवा ईमेल) पाठवलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
परीक्षेचे स्वरूप:
ही परीक्षा पेपर १ आणि पेपर २ अशा दोन भागात विभागलेली होती. उमेदवारांनी त्यांच्या प्रश्नपुस्तिकेच्या संचाप्रमाणे (संच A, B, C, D) उत्तरतालिका तपासून घ्यावी. पेपर २ मधील ‘Decision Making & Problem Solving’ या विभागासाठी पर्यायनिहाय गुणदेखील आयोगाने प्रसिद्ध केले आहेत.\
MPSC Gazetted Combined Prelims 2026 Answer Key
आमचे (Laduli) पोर्टल अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण सरकारी अपडेट्स आणि नोकरी विषयक माहिती दररोज पुरवत असते. आमच्याशी जोडून राहा आणि ही माहिती तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत नक्की शेअर करा!
