- पी हळद हो गोरी: लवकर फळं मिळण्यासाठी उतावळे पणा करणे.
- चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे: वेळ प्रत्येकाची येती कधी सासूची सत्ता चालतो तर कधी सुनेची.
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दन डोळे: अपेक्षे पेक्षा जास्त मिळणे.
- खाई त्याला खवखवे: वाईट काम करणाऱ्या लोकांना सतत भीती असते.
- अति तिथे माती: कोणतेही काम अति प्रमाणात केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात.
- नाकाचा बाल: अत्यंत प्रिय व्यक्ती.
- गरजवंताला अक्कल नसते: गरजू व्यक्तीला काहीही समजत नाही.
- कोल्हा काकडीला राजी: क्षुद्र आणि सामान्य लोक क्षुद्र वस्तूंना भाळतात.
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही: एकाद्या क्षुल्लक माणसाने शाप दिल्यानं काही फरक पडत नाही.
- गरजेची वेळ हीच खरी मैत्री: कठीण प्रसंगात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो.