१).  सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर – दक्षिण असा पसरलेला आहे. येथे उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडे वाहत जातात तसेच सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर यांचा ही जलविभाजक आहे.

२).  महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यात गोदावरी, कृष्ण, भीमा, पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. या नद्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून  वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात.

३).  गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिची महाराष्ट्रातील लांबी ६६८ की. मी. आहे व ती सर्वात जास्त जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे.

४).  संगमनेरा व नेवासा ही ठिकाणे प्रवरा नदीच्या काठावर वसली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहीली.

५).  गोदावरी नदीवर गंगापूर (नाशिक)  हे देशातील पहिले मातीचे धरण आहे.

६). जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात.

७). उजनी धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असे म्हणतात.

८).  गोदावरीला दक्षिणेकडील गंगा असे म्हणतात.

९). भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातून वाहते.

१०). मुळा – नीरा यांचा संगम पुणे येथे होतो.  या नद्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमेला मिळतो.

११).  भीमा – नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यात नीरा – नरसिंगपूर येथे झाला आहे.

१२). महादेव डोंगरांनी भीमा व कृष्णा नद्यांचे पात्र वेगळे झालेले आहे.

१३). सरस्वती ही लृप्त नदी मनाली जाते.

१४). कृष्णा नदी ही सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते.

१५). कृष्णा व कोयना यांचा संगम कऱ्हाड येथे होतो त्यास प्रतिसंगम असे म्हणतात.(यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ)

१६). कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी नगर असे म्हणतात.

१७). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.

१८).  वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.

१९). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.

२०). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.

२१). वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.

२२). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.

२३). तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ती सर्वात लहान पश्चिम वाहिनी नदी आहे.

२४).  उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. (१३० की. मी)

२५).  वैतरणा नदीवर मोडकसागर प्रकल्प आहे.

२६).  वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे.

२७). अंबी ही मुद्रा नदीची उपनदी आहे.

२८). महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)

२९) महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा – रत्नागिरी

३०).  भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला राज्य – गुजरात

******