१) सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?
गणेश वासुदेव जोशी
२) “दर्पणकार”असे कोणाला म्हटले जाते?
बाळशास्त्री जांभेकर
३) महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
१८२७
४) महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत?
गोपाळ हरी देशमुख
५) बॉम्बे चे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले?
१९९५
६) मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा सभा मतदार संघ आहेत?
दोन
७) मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण किती विधानसभा मतदार संघ आहेत?
१०
८) मुंबई महानगर पालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो?
मुंबई महानगर पालिका १८८८
९) महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईतील कोणत्या परिसरात आहे?
नरिमन पॉईंट
१०) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
मुंबई