१). भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?
उत्तर: हिन्दी आणि इंग्रजी दोन्ही
२). भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली?
उत्तर: प्रेम बिहारी नारायण रायजादा
३). भारतीय राज्यघटनेची अनुसूची कशाची संबंधित आहे?
उत्तर: अधिकृत भारतीय भाषा
४). भारताची संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: कॅनडा
५). भारताची राज्यघटना कधी लागू झाली?
उत्तर: २६ जानेवारी १९५०
६). संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: बी. एन. राव
७). भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ११२ नुसार एका वर्षाचे केंद्रीय ……. हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण असते?
उत्तर: अर्थसंकल्प
८). भारतीय राज्यघटनेच्या राजकीय भाग मुख्यतः कोणत्या राज्यघटनेतून घेतला आहे?
उत्तर: ब्रिटिश संविधान
९). “धर्मनिरपेक्ष” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?
उत्तर: सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत
१०). प्रस्तावनातील कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि आखंडतेवर भर देतात?
उत्तर: बंधुता
११). संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?
उत्तर: ९ डिसेंबर १९४६
१२). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन “ध्येय आणि आकाक्षांचे” जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
१३). अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या प्रशासन आणि नियंत्रण बाबींच्या तरतुदी कोणत्या अनुसूची मध्ये आहेत?
उत्तर: पाचवी अनुसूची
१४). सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते?
उत्तर: १४ वर्षे
१५). कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये सिंधी भाषेचा समावेश केला?
उत्तर: २१ वी घटना दुरुस्ती, १९६७
१६). भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समान नागरी संहितेची तरतूद आहे?
उत्तर: कलम ४४
१७). संसदेकडे कायदे करण्याचा उर्वरित अधिकार कोणत्या कलमाखाली असतो?
उत्तर: कलम २४८
१८). संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या किती आहे?
उत्तर: ३३ न्यायाधीश + १ मुख्य न्यायाधीश एकूण ३४ न्यायाधीश
१९). कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते?
उत्तर: इंग्लड ची संसद
२०). १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?
उत्तर: नियमन कायदा १७७३
२१). भारतासाठी संविधान सभेची कल्पना सुरवातीला कोणी मांडली?
उत्तर: एम एन रॉय
२२). भारताचे पहिले व्हाइसरॉय कोण बनले?.
उत्तर: १८५८ मध्ये लॉर्ड कॅनिंग
२३). भारताच्या संविधानवर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते?
उत्तर: संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी
२४). राज्याचा राज्यपालांना कोण शपथ देते?
उत्तर: उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
२५). न्यायालयाने मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना काय म्हणतात?
उत्तर: मित्र क्युरी
२६). भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अ अंतर्गत एक आयोग असेल त्याला काय म्हणतात?
उत्तर: राष्टीय अनुसूचीत जमाती आयोग
२७). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद नवीन राज्य स्थापित करू शकते?
उत्तर: कलम ३
२८). कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय २१ वर्षावरुण १८ वर्षे करण्यात आले?
उत्तर: ६१ वी घटनादुरुस्ती, १९८८
२९). राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे वर्णन ध्येय आणि आकाक्षांचे जाहीरनामा म्हणून कोणी केले?
उत्तर: केसी व्हेअर
३०). जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: जिल्हाधिकारी
३१). भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
उत्तर: भारताचा महान्यायवादी
३२). कोणत्या घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
उत्तर: गुजरात
३३). सरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सामंत झाला नाही तर काय होऊ शकते?
उत्तर: एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.
३४). भारतीय संसदेची स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती आहेत?
उत्तर: १) शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण. २) कामगिरीचे मूल्यमापन व देखरेख. ३)राज्यशासनाच्या कार्याचे मूल्यमापन
३५). वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास
उत्तर: पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
३६). संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्य नाही?
उत्तर: माता व पित्याचा भारतात जन्म
३६). भारताचे कोणते न्यायाधीश होते ज्याने काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदांची जबाबदारी सांभाळली?
उत्तर: एम हिदायतुल्लां
३७). भारतीय संविधानाने नागरीकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली?
उत्तर: उद्देशपत्रिका
३८). आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिठेचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हटले आहे.
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू
३९). शिक्षणाच्या व्यावसायिकांवर कोणत्या समितीने भर दिला?
उत्तर: चटोपाध्याय समिती
४०). निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा.
उत्तर: १) मतदार संघाची आखणी करणे. २)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे
४१). विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
उत्तर: २५ वर्षे
४२). महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
उत्तर: १ मे १९६२
४३). भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती आखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?
उत्तर: तीन
४४). राज्यघटनेने कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहेत?
उत्तर: राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार संबंधित तरतुदी
४५). राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्यशील राहील हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
उत्तर: ४२ वी घटनादुरुस्ती
४६). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली?
उत्तर: १७९३ चा सनदी कायदा
४७). भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबद सुचवतो?
उत्तर: मूलभूत कर्तव्ये
४८). राष्टीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
उत्तर: ५ वर्षाचा
४९). संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणूक पौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?
उत्तर: ३२६
५०). आंतरराष्टीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?
उत्तर: डॉ नागेंद्र सिंह
५१). भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
उत्तर: संसद
५२). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
उत्तर: ४४
५३). राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
उत्तर: कलम २४
५४). ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमाला दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बळवंतराय मेहता समितीने केली?
उत्तर: पंचायत समिती
५५). ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
उत्तर: जिल्हा परिषदची स्थायी समिती
५६). सरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामसभेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: उपसरपंच
५७). स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणा मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
उत्तर: फ्रान्सची राज्यक्रांती
५८). राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांनी भूमिका दिसून येते?
उत्तर: राज्यघटनेचा सरनामा
५९). आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगीत होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेद्वारे स्वीकारली?
उत्तर: वायमार प्रजासत्ताक ची घटना
६०). घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेचा आधारे झाली?
उत्तर: कॅबिनेट मिशन
६१). जनमत हा कोणत्या प्रकारचा शासन व्यवस्थे चा अविभाज्य घटक आहे?
उत्तर: प्रत्यक्ष लोकशाही
६२). सार्वजनिक निवडणुकीनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
उत्तर: सरपंच
६३). जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर: वसंतराव नाईक
६४). महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय ?
उत्तर: वसंतराव नाईक
६५). राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे, अशा स्वरूपाचा निर्णय ……………या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
उत्तर: केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार
६६). राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
उत्तर: पंतप्रधान
६७). संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: एच सी मुखर्जी
६८). संविधान सभेच्या तात्पुरती अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: डॉ सच्चितानंद सिन्हा
६९). सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांची नेमणूक कोण करतात?
उत्तर: सरन्यायाधीसांचे आल्याचे राष्ट्रपती
७०). आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते?
उत्तर: निवडणूक आयोग
*****समाप्त*****