
📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| नाशिक महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 16 |
| सुरगाणा महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 12 |
| त्र्यंबकेश्वर महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 3 |
| पेठ महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 4 |
| बागलाण महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 26 |
| देवळा महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 8 |
| इगतपुरी महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 10 |
| दिंडोरी महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 16 |
| कळवण महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 14 |
| चांदवड महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 4 |
| निफाड महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 11 |
| येवला महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 5 |
| सिन्नर महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 7 |
| मालेगाव महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 14 |
| नाशिक ग्रामीण / नांदगाव महसूल सेवक (कोतवाल) | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). | 6 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक: | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
Nashik Kotwal Recruitment 2026: नाशिक जिल्ह्यात १५६ कोतवाल पदांची भरती जाहीर!
शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या एकूण १५६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Nashik Kotwal Bharti 2026
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| तपशील | दिनांक |
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | ०३ ऑक्टोबर २०२६ |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ ऑक्टोबर २०२६ |
| परीक्षेची तारीख / निवड प्रक्रिया | जाहिरातीत दर्शवल्यानुसार / संबंधित तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात येईल |
प्रमुख तपशील टेबल (Key Details Summary)
| घटक | तपशील |
| पदनाव | महसूल सेवक (कोतवाल) |
| एकूण रिक्त जागा | १५६ जागा |
| शैक्षणिक पात्रता | उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला). |
| वयोमर्यादा | शासन नियमांनुसार लागू (किमान १८ ते ४० वर्ष आणि कमाल प्रवर्गामानुसार) |
| नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा (विविध तालुके) |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत संकेतस्थळ | संबंधित एन.आय.सी. (NIC) संकेतस्थळ / तहसील कार्यालय |
तालुका रिक्त पदांचा तपशील (Talukawise Vacancy Details)
| अ.क्र. | तालुक्याचे नांव | रिक्त पदे |
| 1 | नाशिक | 16 |
| 2 | सुरगाणा | 12 |
| 3 | त्र्यंबकेश्वर | 3 |
| 4 | पेठ | 4 |
| 5 | बागलाण | 26 |
| 6 | देवळा | 8 |
| 7 | इगतपुरी | 10 |
| 8 | दिंडोरी | 16 |
| 9 | कळवण | 14 |
| 10 | चांदवड | 4 |
| 11 | निफाड | 11 |
| 12 | येवला | 5 |
| 13 | सिन्नर | 7 |
| 14 | मालेगाव | 14 |
| 15 | नाशिक ग्रामीण / नांदगाव | 6 |
| एकूण पदे | — | 156 |
Nashik Kotwal Bharti 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व सविस्तर अटी व शर्ती:
अधिकृत संकेतस्थळ: प्रस्तुत पदांकरिता फक्त https://nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पद्धतीने भरलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपुर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदवड भाग हे जबाबदार असणार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
अर्ज सादर करण्याचा कालावधी: पात्र उमेदवाराला वेब बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज https://nashik.kotwal.org या वेबसाइटद्वारे दिनांक 03/10/2026 रोजी सकाळी 10.00 पासून ते दिनांक 17/10/2026 रोजी सायंकाळी 05.45 पर्यंत या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
कागदपत्रे व माहिती भरण्याबाबत: उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे, हमीपत्रे अपलोड करणे अर्जदारास बंधनकारक राहील. तसेच ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
लेखन व पात्रता छाननी: उमेदवाराची लेखीपरीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. लेखीपरिक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार मुळ कागदपत्रे पडताळणीकामी यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार उपविभागीय अधिकारी, चांदवड उपविभाग, चांदवड यांचे जवळ राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.
सविस्तर सूचना: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://nashik.kotwal.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रक्रिया शुल्क (Payment): संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरता येईल:
नेटबँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / गुगल पे / फोन पे द्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यास निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक ते बँकेचे सेवा शुल्क भरावे लागेल.
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी (Payment Transaction Successful) झाल्याची खात्री करून घ्यावी. प्रक्रिया शुल्क भरण्याकरिता नेटबँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / गुगल पे / फोन पे वापरून होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी संपूर्णतः उमेदवाराची आहे व उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदवड यास जबाबदार असणार नाही.
फोटो व सही अपलोड करणे: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत (Latest) विहित नमुन्यातील पासपोर्ट साईझ फोटो व सही स्कॅन करून https://nashik.kotwal.org संकेतस्थळावरील सूचनेनुसार विहित पद्धतीने अपलोड करणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची अंतिम वेळ: ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख व वेळेनंतर संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
माहितीचे अपडेट्स: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रूपरेषा/वेळापत्रक, परीक्षा केंद्र / बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती वरील वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. यासंबंधी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
रोजगार व स्वयंसहाय्यता नोंदणी: ज्या उमेदवारांनी यापूर्वी जरी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवायोजन कार्यालय किंवा समाजकल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात नावे नोंदविलेली आहेत, अशा उमेदवारांना विहित मुदतीत स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे व परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील. अशा उमेदवारांनी अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि अशा उमेदवारांना या कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
माजी सैनिक: माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे लागेल.
आरक्षण व जात प्रमाणपत्र / नॉन-क्रिमीलेयर: महाराष्ट्र शासन महसूल व इतर विभागांच्या नियमानुसार, उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमिनल लेयर) तत्त्व वि.जा. (अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांना लागू आहे. या प्रवर्गातील उमेदवारांनी जात, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे वर्ष २०२६-२७ या कालावधीकरिता वैध असलेले (अद्ययावत अर्थात ३१/०३/२०२७ पर्यंत वैध असलेले) नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र: सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना व महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ अन्वये शासनाने गट अ, ब, क, ड मधील सेवा प्रवेशासाठी विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
गैरप्रकार व कारवाई: ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे लेखी परीक्षेसाठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित अर्हता धारण न करणारा आढळल्यास, खोटी माहिती पुरविल्यास, किंवा एखाद्या अर्जदाराने निवडीसाठी निवड समितीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव आणल्यास किंवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
खोटी माहिती: निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी व नियुक्ती रद्द करण्यात येईल आणि शासनाची दिशाभूल केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अपात्र अर्जदार: अपात्र अर्जदारांस स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही.
खर्च: परीक्षेस किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
इतर नियम: वरील अटी, शर्ती, नियमांव्यतिरिक्त शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्णय लागू राहतील.
Kotwal Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
Nashik Kotwal Bharti 2026
Nashik Kotwal Bharti 2026: नाशिक जिल्ह्यात १५६ कोतवाल पदांची भरती जाहीर!