New भरती
अर्ज सुरू आहे
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 20-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 10-09-2026 17:00
📍 नोकरी ठिकाण: लातूर
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 79
💰 परीक्षा फी: (1) अमागास: 1000/- (2) मागासवर्गीय/आ.दु.घ: 900/-
📏 वयोमर्यादा: [As on 20-08-2026] (i) अमागास : 18 To 38Y (ii) मागासवर्गीयांसाठी: 18 To 43 Yrs
📝 परीक्षा तारीख: Update नंतर दिला जाईल

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
गट-ड (वर्ग-४) समकक्षी विविध पदेशासन मान्यता प्राप्त बोर्डाची माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भाषेचे ज्ञान: उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.79
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

जाहिरात महत्त्वाची माहिती (Job Overview) Vilasrao Deshmukh Medical College Latur Bharti 2026

  • संस्थेचे नाव: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर

  • पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) समकक्षी विविध पदे

  • एकूण रिक्त जागा: 79 पदे

  • नोकरीचे ठिकाण: लातूर (महाराष्ट्र)

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (कम्प्युटर बेस्ड टेस्ट)

 रिक्त जागांचा तपशील (Vacancies Table)

अ.क्र. पदाचे नाव पदाची वेतनश्रेणी रिक्त पदांची संख्या
कक्षसेवक एस-१ (रु. १५०००-४७६००) ३६
बाह्यरुग्ण विभाग सेवक एस-१ (रु. १५०००-४७६००) ०५
शिपाई एस-१ (रु. १५०००-४७६००) १०
माळी एस-१ (रु. १५०००-४७६००) ०१
स्वयंपակի एस-३ (रु. १६६००-५२४००) ०४
क्ष-किरण सेवक एस-१ (रु. १५०००-४७६००) ०१
प्रयोगशाळा परिचर एस-१ (रु. १५०००-४७६००) ०१
रक्तपेढी परिचर एस-१ (रु. १५०००-४७६००) ०१
अपघातविभाग सेवक एस-१ (रु. १५०००-४७६००) ०४
१० सहायक स्वयंपակի एस-१ (रु. १५०००-४७६००) ०४
११ पहारेकरी एस-१ (रु. १५०००-४७६००) ०५
१२ न्हावी एस-३ (रु. १६६००-५२४००) ०४
१३ धोबी एस-१ (रु. १५०००-४७६००) ०३

Vilasrao Deshmukh Medical College Latur Bharti 2026

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: २० ऑगस्ट २०२६ रोजी १७:०० वाजल्यापासून

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० सप्टेंबर २०२६ रोजी १७:०० वाजेपर्यंत

  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत

  • परीक्षा दिनांक: संकेतस्थळावर यथावकाश जाहीर केला जाईल.

परीक्षा शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: रु. १०००/-

  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): रु. ९००/-

शिकाण, वयोमर्यादा व अट

  • शिक्षण: पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार राहतील (सविस्तर तपशीलासाठी मूळ जाहिरात पहावी).

  • वयोमर्यादा:  अमागास : 18 To 38Y (ii) मागासवर्गीयांसाठी: 18 To 43 Yrs 


पदसंख्या व आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या अटी व तरतुदी:

४.१ पदसंख्या बदल: पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे.

४.२ संकेतस्थळावर सूचना: पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्याआधारे भरती प्रक्रिया राबवली जाईल.

४.३ अतिरिक्त मागणीपत्राबाबत: जाहिरातीत काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नसली तरी, परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे “पद आरक्षित नसल्यामुळे अर्ज केला नाही” अशी तक्रार नंतर ग्राह्य धरली जाणार नाही.

४.४ महिला आरक्षण: महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये महाराष्ट्राचे रहिवासी (Domiciled) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच, महिला व बालविकास विभागाच्या ४ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. परंतु, अनु. जाती व जमाती वगळता इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील.

४.५ विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजा-भज): विजा (अ), भज (ब), भज (क) व भज (ड) प्रवर्गासाठी आरक्षित पदे आंतरपरिवर्तनीय असून योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे गुणवत्तेनुसार विचार केला जाईल.

४.६ जात प्रमाणपत्र: राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र घोषित केलेल्या जातीचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र अर्ज करताना उपलब्ध असणे आवश्यक आहे.

४.७ ते ४.११ इतर आरक्षण नियम: समांतर आरक्षण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), नॉन क्रिमिलेअर वैधता कालावधी आणि मागास प्रवर्गातील वयोमर्यादेच्या सवलतीबाबत शासनाच्या वेळोवळीच्या परिपत्रकानुसार व नियमानुसार कार्यवाही केली जाईल.

४.१२ खुला प्रवर्ग व मूळ प्रवर्ग माहिती: सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

४.१३ रहिवासी अट: आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच अनुज्ञेय आहे.

४.१४ वैध प्रमाणपत्र: आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

४.१५ न्यायप्रविष्ट प्रकरणे: सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातील विविध न्यायालया मधील न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबवली जाईल.

Vilasrao Deshmukh Medical College Latur Bharti 2026


 परीक्षा कालावधी

परीक्षा कालावधी २ तास (१२० मिनिटे)

अभ्यासक्रम:

  • मराठी भाषा: सर्वसामान्य शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

  • इंग्रजी भाषा: Common Vocabulary, Sentences Structure, Grammar, Use of Idioms and phrases.

  • सामान्य ज्ञान:

    1. इतिहास: आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा

    2. भूगोल: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासाक्रमासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

    3. अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकींग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी.

    4. चालू घडामोडी: महाराष्ट्रासह भारतातील

    5. राज्यशास्त्र

    6. सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, व आरोग्यशास्त्र इत्यादी

  • अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

उपरोक्त अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी ही इयत्ता दहावी लेव्हलची असेल.

परीक्षेचे स्वरूप:

१. परीक्षा ही ऑनलाईन (COMPUTER BASED TEST) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.

२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२ प्र.क्र. १४ का १३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गट ड (वर्ग-४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (एस.एस.सी.) दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदाकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.

४. उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०१७/प्र.क्र.३१/९८/१६-अ दि. १६/०३/१९९९ आणि शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण ११९९/प्र.क्र.३९/१६ अ दि. १९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३ दि. ४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

६. परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ दि. ४ मे २०२२ मध्ये नमूद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.

७. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. तसेच त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा/कमी केले जाणार नाहीत.

८. परीक्षा ही Computer Based Test ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर समानीकरण (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

Vilasrao Deshmukh Medical College Latur Bharti 2026


गैरप्रकरणी अन्य कारवाई:-

१. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या परीक्षेत अथवा परिक्षेनंतर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गैरप्रकारचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर तसेच उमेदवार नसलेल्या परंतु गैरप्रकार करण्यास सहाय्यभुत ठरणाऱ्या व्यक्तींवर प्रचलीत कायदा व नियमानुसार फौजदारी अभियोग दाखल करुन कारवाई करण्यात येईल.

२. उपरोक्त कृत्यांपैकी प्रकरणपरत्वे एक किंवा अनेक कृत्य करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा करण्यास प्रोत्साहन देणे, यांकरिता संबंधित कायदयानुसार फौजदारी अभियोग दाखल करण्यासह पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येईल:-

  • I) संबंधित निवड प्रक्रिया अनाठयी ठरविणे आणि/ किंवा

  • II) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर मार्फत आयोजित सर्व परिक्षा अथवा निवड प्रक्रिया करीता कायमस्वरुपी किंवा ठराविक कालावधी करीता प्रतिरोधीत करणे.

  • III) गैरप्रकारच्या अथवा गैरप्रकारच्या प्रयत्नाच्या आधारे नोकरी मिळविलेल्या उमेदवार व्यक्तीची शिफारस रद्द करणे व त्यानुसार संबंधित विभाग कार्यालयाकडून सेवा समाप्तीची कार्यवाही.

  • IV) उमेदवार नोकरीत असल्यास, उचित नियमानुसार संबंधीत विभागामार्फत कार्यवाही.

  • V) संबंधित परिक्षेत उमेदवाराने मिळविलेल्या गुणांमध्ये वजावट करणे.

    ३. परिक्षेच्या ठिकाणी स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधणे, सिमकार्ड, ब्ल्यूटुथ, दुरसंचार साधणे म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोटस, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, लेखन पॅड, पाउच परिगणक (CALCULATOR) इत्यादी प्रकारची साधने/ साहित्य बाळगल्यास सदर साधने / साहित्य जप्त करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Vilasrao Deshmukh Medical College Latur Bharti 2026


🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.