⚠️ जुनी जाहिरात (History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 12-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 15-08-2026 18:00
📍 नोकरी ठिकाण: भंडारा जिल्हा (संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद क्षेत्र).
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 466
💰 परीक्षा फी: (1) All: 100/-
📏 वयोमर्यादा: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
📝 परीक्षा तारीख: मुलाखत दिनांक (Interview Dates): १६ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६.

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE)(HSC) उत्तीर्ण, पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रता (MS-CIT / CCC संगणक प्रमाणपत्र आवश्यक).466
🔴 या बॅचची मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

माहिती (Information in Marathi)

महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (सेतू शाखा) Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत आणि नगरपरिषद क्षेत्रासाठी रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (Aaple Sarkar Seva Kendra) चालविण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४६६ रिक्त केंद्रांचे वाटप गुणांकनावर आणि मुलाखतीद्वारे केले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. १२ ऑगस्ट २०२६ पासून १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महत्त्वाचे तपशील तक्ता (Key Details Table)

तपशील (Details) माहिती (Information)
भरती मंडळाचे नाव (Organization Name)

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (सेतू शाखा)

पदाचे नाव (Post Name)

आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE)

एकूण जागा (Total Vacancies)

४६६ जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण, पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रता (MS-CIT / CCC संगणक प्रमाणपत्र आवश्यक).

वयोमर्यादा (Age Limit)

अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

भंडारा जिल्हा (संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद क्षेत्र).

अर्ज करण्याची पद्धत (Application Mode)

ऑनलाईन (Online).

अर्ज शुल्क (Application Fee)

रु. १००/- (जिल्हा सेतू समितीच्या खात्यावर भरणे आवश्यक).

अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date)

१२ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० पासून).

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date)

१५ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत).

मुलाखत दिनांक (Interview Dates)

१६ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६.

अधिकृत संकेतस्थळ (Official Websites)

https://asskbhandara.in/, https://bhandara.gov.in/

रिक्त जागांचा तपशील (Vacancy Breakdown)

१. ग्रामपंचायत क्षेत्र (संपूर्ण भंडारा जिल्हा): ४५७ जागा

२. नगर परिषद भंडारा क्षेत्र: ०९ जागा

  • एकूण जागा: ४६६ जागा


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (HSC/पदवी/पदव्युत्तर)

  • संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा CCC किंवा समकक्ष)

  • जागेची चालू वर्षाची कर पावती / विद्युत देयक (2026-2027) किंवा भाडेकरारनामा

  • कॉमन सर्विस सेंटर (CSC) प्रमाणपत्र (असल्यास)

  • पासपोर्ट साईज फोटो व सही

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026


ब) अटी व शर्ती :-

१. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतद १) शासन निर्णय क्र. मातंस- १७१६/प्र.क्र.५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८, २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/माते (३९) सामान्य प्रशासन विभाग दिनांक २७ मार्च २०२५, ३) शासन शुद्धीपत्रक क्रमांक मातंसं ०४८/प्र.क्र.१/२०२५ दिनांक ०९ जुलै २०२५ च्या शासन निर्णयाला अधिन राहुन आपले सरकार केंद्राचे वाटप व केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रकामधील अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदारास अनिवार्य राहील.

२. अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा. (ग्रामपंचायत क्षेत्राकरीता संपूर्ण ग्रामपंचायत भौगोलिक घटक, नगर परिषद व नगरपंचायत साठी संपूर्ण नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्र व महानगरपालिकेसाठी संपूर्ण महानगर पालिकेचे क्षेत्र भौगोलिक घटक म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल.

३. अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

४. शासन निर्णय दि.१९ जानेवारी २०१८, दि. २७ मार्च २०२५ व शासन शुद्धीपत्रक ०९ जुलै २०२६ नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर (परिशिष्ट ड), तसेच केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा (परिशिष्ट ‘क’) दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालु ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.

५. शासनाने पुरवलेल्या आज्ञावली इ. चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे, आवेदकांना बंधनकारक राहील.

६. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अधिसूचित ठिकाणच चालवणे क्रम प्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरूपाची चूक समजुन केंद्र रद्द करण्यात येईल.

७. अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतो.

८. तसेच यापुर्वी ज्यांच्याकडे स्वतःःकिंवा कुटुंबात आधी पासुन आपले सरकार सेवा केंद्र सुरु असेल त्याचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. कुटुंबातील एकच व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यास पात्र राहील. (कुटुंब म्हणजे पती, पत्नी व अविवाहीत मुले/मुली)

९. आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी रहिवासाबाबत दिलेली माहिती किंवा इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये जर चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येवुन अपात्र ठरविण्यात येईल. व निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल.

१०. अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. अर्जदाराने अर्ज करताना दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपविल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल. यासंदर्भात पोलीस विभागाचा निर्णय अंतीम समजण्यात येईल.

११. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी वेळोवेळे दिलेल्या आदेशांचे/निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच त्यांनी केंद्राबाबत मागीतलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील.

१२. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातुन विहित शुल्कात देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच अभिप्राय कक्षाकडून केंद्र चालकाच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल.

१३. शासनाचे साहित्य प्राप्त झाल्यास त्याचे काटकसरीने वापर करुन संरक्षण व जतन करावे लागेल, तसेच डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्यावे लागेल.

१४. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्ती केलेले अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी /तपासणी करु शकतात. यांनी वेळोवेळे दिलेल्या सुचना/निर्देश/आदेश यांचे पालन करणे बंधनकारक राहील.

१५. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शासन शुद्धीपत्रक दि.०९ जुलै २०२६ नुसार गुणांकन प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा सेतू समितीचा निर्णय अंतिम राहील.

१६. मा.जिल्हाधिकारी भंडारा केंद्र व राज्य शासनाचे / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रमांचे/महामंडळे यांचे शासकीय सेवांमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी/कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी यांना आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करता येणार नाही.

१७. ज्या केंद्र चालकांवर यापूर्वी भंडारा जिल्हा/तालुका प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असेल अशा केंद्र चालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेवटची एक संधी म्हणून या जाहिरातीमध्ये त्यांना अर्ज करता येईल व या जाहिरातीमधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. मात्र ज्या केंद्रचालकावर प्रशासनामार्फत फौजदारी कार्यवाही प्रस्तावित आहे किंवा करण्यात आलेली आहे. त्यांचा विचार करण्यात येणार नाही.

१८. अंतिम पात्र झालेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र १ महिन्यात सुरु करणे बंधनकारक राहील. प्रारंभी ३ वर्षाचा करार देण्यात येईल व पुढील नूतनीकरण केंद्राचे कार्यप्रदर्शन निर्देशकांच्या आधारावर करण्यात येईल.

१९. आपले सरकार सेवा केंद्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, भंडारा यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील, याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.

२०. जाहिरात प्रसिद्ध करणे, स्थगीत करणे, जाहिरातीमध्ये दुरुस्ती, संपूर्ण प्रक्रिया रद्द करणे, किंवा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, भंडारा यांना राहतील.

२१. काही अपरिहार्य कारणास्तव (तक्रारी अथवा अनियमितता आढळल्यास) तालुक्यातील एखाद्या किंवा काही केंद्राचा निर्णय राखीव ठेवून चौकशी अंती अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा सेतू समिती कडे राहतील.

Bhandara Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.