📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम - पेसा व नॉन-पेसा) | एच.एस.सी., डी.एड. (HSC, D.Ed) आणि TAIT-२०२५ परीक्षा उत्तीर्ण | 1526 |
| माध्यमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम - पेसा व नॉन-पेसा) | बी.ए./बी.एसस्सी. आणि बी.एड. (B.A./B.Sc. & B.Ed) | 517 |
| उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) | एम.ए./एम.एसस्सी. आणि बी.एड. (M.A./M.Sc. & B.Ed) | 378 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
महत्त्वाचे तपशील एका नजरेत (Quick Highlights) TAIT 2025 Pavitra Portal
-
प्रक्रिया (Process): शिक्षक पदभरतीसाठी प्राधान्यक्रम (Preferences) जनरेट व लॉक करणे
-
अर्ज/प्राधान्यक्रम सुरू होण्याची तारीख (Start Date): ६ ऑगस्ट २०२६
-
प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख (Last Date to Lock Preferences):
११ ऑगस्ट २०२६१३ ऑगस्ट २०२६ -
अधिकृत संकेतस्थळ (Official Website):
[https://tait2025.mahateacherrecruitment.org.in]तांत्रिक मदत ईमेल (Support Email): edupavitra25@gmail.com
TAIT 2025 Pavitra Portal
महत्त्वाचे तपशील एका नजरेत (Quick Highlights)
-
एकूण जागा (Total Vacancies): २४२१ जागा.
-
नौकरीचे ठिकाण (Job Location): नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर (आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळा – पेसा / नॉन-पेसा क्षेत्र)
-
प्राधानक्रम जनरेट करण्याची तारीख (Preference Generation Date): ०६ ऑगस्ट २०२६ पासून
-
प्राधानक्रम लॉक करण्याची अंतिम तारीख (Preference Lock Last Date): ११ ऑगस्ट २०२६
-
परीक्षा शुल्क (Application Fee): लागू नाही (पिवळ्या पोर्टलवर नोंदणीकृत TAIT-२०२५ उमेदवारांसाठी)
-
अधिकृत संकेतस्थळ (Official Website):
[https://tait2025.mahateacherrecruitment.org.in] -
(https://tait2025.mahateacherrecruitment.org.in)किंवा[https://tribal.maharashtra.gov.in](https://tribal.maharashtra.gov.in)
पदसंख्या, शिक्षण व वयोमर्यादा तपशील (Vacancy, Education & Age Table)
| पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा (Vacancies) | आवश्यक शिक्षण (Education Qualification) | वयोमर्यादा (Age Limit) | नोकरीचे ठिकाण (Job Location) |
| प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम – पेसा व नॉन-पेसा) |
१५२६ |
एच.एस.सी., डी.एड. (HSC, D.Ed) आणि TAIT-२०२५ परीक्षा उत्तीर्ण |
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार (टीईटी/टेट पात्रता निकषांच्या अधीन) |
नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर |
| माध्यमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम – पेसा व नॉन-पेसा) |
५१७ |
बी.ए./बी.एसस्सी. आणि बी.एड. (B.A./B.Sc. & B.Ed) |
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार |
नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर |
| उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) |
३७८ |
एम.ए./एम.एसस्सी. आणि बी.एड. (M.A./M.Sc. & B.Ed) |
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार |
नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर |
| एकूण पदसंख्या |
२४२१
|
— | — | — |
महत्त्वाची माहिती व अटी (General Instructions)
-
प्राधानक्रम लॉक करणे: उमेदवारांना त्यांचे प्राधानक्रम जनरेट करून दिनांक ०६/०८/२०२६ ते १३/०८/२०२६ या कालावधीत लॉक करणे बंधनकारक आहे.
-
पात्रता निकष: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२५) दिलेल्या आणि स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी करता येईल.
-
तांत्रिक मदत: प्राधानक्रम जनरेट करताना किंवा ओटीपी (OTP) मिळण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास उमेदवारांनी
edupavitra25@gmail.comया ईमेलवर संपर्क साधावा
प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या महत्त्वाच्या अटी व सूचना (Important Guidelines)
-
प्राधान्यक्रमांची मर्यादा: मुलाखतीशिवाय (Without Interview) या प्रकारासाठी जास्तीत जास्त १०० आणि मुलाखतीसह (With Interview) या प्रकारासाठी जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम उमेदवार लॉक करू शकतात.
-
मुदत: उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक ६ ऑगस्ट २०२६ ते १३ ऑगस्ट २०२६ हा कालावधी देण्यात आला आहे.
-
एकवेळ संधी: शासन निर्णयानुसार TAIT-२०२५ मधील गुण हे निवडीच्या शिफारशीसाठी केवळ एकवेळ लागू राहतील. पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास दुसऱ्या पदावर निवड होणार नाही.
-
तांत्रिक अडचण आल्यास: प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक करताना तांत्रिक अडचणी आल्यास ब्राउझरची हिस्टरी/कॅशे (History/Cache clear) साफ करावी अथवा इन्कोग्निटो विंडो (Incognito Window) वापरून पहावी.
प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या सविस्तर सूचना
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ३०/०५/२०२५ व दिनांक ०२/०६/२०२५ ते दिनांक ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते.
२. या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती.
३. [https://tait2025.mahateacherrecruitment.org.in] (https://tait2025.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्व-प्रमाणपत्र (Self Certified copy) पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागीता येईल.
४. उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा दिनांक ०६/०८/२०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
५. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील Home Page वर Download या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत.
६. उमेदवारांना लॉगिन केल्यानंतर Generate Preference या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे Generate करता येईल. प्राधान्यक्रम Generate केल्यानंतर Generate झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. ७. मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार Generate व Lock करू शकतील.
८. उमेदवारांना प्राधान्यक्रम Lock करण्यासाठी दिनांक ०६/०८/२०२६ ते १३/०८/२०२६ असा कालावधी देण्यात येत आहे.
९. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत.
१०. पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय (Without Interview) पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल.
११. शासन निर्णय दिनांक ०२/०४/२०२६ मधील तरतुदीनुसार उमेदवाराचे टेट २०२५ (TAIT 2025) चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एकवेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाआधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही, उमेदवारास निवडप्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा घ्यावी लागेल.
१२. उमेदवारांना मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. मुलाखतीशिवाय (Without Interview) या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीतजास्त १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह (With Interview) या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीतजास्त ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.
१३. उमेदवारांनी पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम Generate होतील.
१४. जे उमेदवार प्राधान्यक्रम Generate करून Lock करणार नाहीत, ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.
१५. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी, अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील, तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्तीसाठी/मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
१६. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२५ या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १४/०५/२०२५ असा होता, त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र. १०६/टीएनटी-१ दिनांक ०२/०५/२०२५ नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारदेखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२५ या चाचणीस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिनांक २५/०९/२०२५ पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेले आहे.
१७. उमेदवारांची दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक २५/०९/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगीनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापननिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने Lock केलेले प्राधान्यक्रम (Locked Preferences) निवडप्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.
१८. उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम Generate होतील. स्व-प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे उमेदवारास प्राधान्यक्रम Generate झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत अन्यथा असे उमेदवार नियुक्तीसाठी कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. याबाबत उमेदवार स्वतः जबाबदार राहतील.
१९. उमेदवारांनी प्राधान्यक्रम Generate करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी Generate केलेले प्राधान्यक्रम Delete करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा Generate करून लॉक करता येतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत.
२०. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्या क्रमाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२५ (TAIT 2025) परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी / मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर, उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही.
२१. उमेदवारांचे लॉगिन हे OTP Base असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा आहे, त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर) यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा.
२२. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्गाची प्रमाणपत्रे / समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, इतर सवलती संबंधीची प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली, तरी त्यांपैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापनाकडून केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
२३. उमेदवाराने स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र पोर्टलवर खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती नमूद केली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल, किंवा त्यात बदल केला असेल, किंवा कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड केल्याचे दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास, असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल तसेच तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील.
२४. चारित्र्य / पूर्वचारित्र्य पडताळणीअंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी / सेवेसाठी पात्र राहणार नाही. तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील.
२५. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी View Locked Preferences (Without Interview) तसेच मुलाखतीसह यासाठी View Locked Preferences (With Interview) या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल.
२६. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट/विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.
२७. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
-
अ. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या Browser ची History / Cache clear करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास Incognito Window (Private Window) चा वापर करावा.
-
आ. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट (उदाहरणार्थ, इयत्ता १ ते ५, ६ ते ८, ९ ते १०, ११ ते १२ व डी. एड. कॉलेज शिक्षक) अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण (समांतर आरक्षणासह) इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate होत आहेत. उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या Home Page वरील Download अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे अवलोकन करावे. त्यामधील आरक्षण व विषय यांसह वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे प्राधान्यक्रम Generate होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम नव्यानी Generate करावेत. Generate केलेले प्राधान्यक्रम Delete करून नव्याने प्राधान्यक्रम Generate करण्यासाठी संधींची मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने Generate केलेले प्राधान्यक्रम Lock करणे आवश्यक आहे.
२८. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदांच्या / विषयांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. अशा बदल झालेल्या पदांसाठी / विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम Generate करून Lock केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी / मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२९. उमेदवारांचा लॉगीन आयडी (Login ID) हा 25_xxxxxxxxxx (दहाअंकी TAIT 2025 चा रोल नंबर) या प्रमाणे असेल. Password विसरला असल्यास Forgot Password या सुविधेचा वापर करून Password नव्याने तयार करता येईल.
३०. स्थानिक स्वराज्य संस्था (जिप/मनपा/नप), शासकीय विद्या निकेतन तसेच आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय शाळांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत देणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात) पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
३१. बृहन्मुंबई महानगर पालिकेतील (MNP MUMBAI SUB PRIMARY – 2722MCP01) अंतर्गत शिक्षण खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील एकूण ४ जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या [https://portal.mcgm.gov.in](https://portal.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात त्यांच्या अटी व शर्तीसह उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. जाहिरातीत नमूद पात्रताविषयक अटी व शर्ती यांचे तंतोतंत पालन होत असेल तरच उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेचे प्राधान्यक्रम लॉक करावेत. जाहिरातीत नमूद संबंधित पदांसाठीची पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यास व अशा उमेदवारांची निवडीसाठी शिफारस होऊन कागदपत्र पडताळणीच्या वेळी अपात्र ठरल्यास असे उमेदवार त्यास स्वतः जबाबदार राहतील.
३२. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील.
३३. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात) पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
३४. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी तीन उमेदवारांची (१:३ या प्रमाणात) पोर्टलमार्फत मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येईल. शासन निर्णय दिनांक ०२/०४/२०२६ मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उमेदवाराच्या निवडीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून पूर्ण होईल.
३५. मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक १४५१७-१४५३९/२०२५ मधील दिनांक २३/०३/२०२६ रोजीच्या आदेशाअन्वये TAIT-२०२५ नुसार होणाऱ्या पदभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेत (CTET/TET) त्यांच्या आरक्षणानुसार सवलतीचे गुण घेऊन पात्र ठरलेले उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांसाठी पात्र ठरतील.
३६. मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून प्राधान्यक्रम घेण्यात येत आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
३७. प्राधान्यक्रम Generate, Save, Assign, Re-arrange, Lock इत्यादी बाबीची कार्यवाही करण्यासाठी सन २०२२ मधील पदभरतीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेले User Manual उमेदवारांना विचारात घेता येईल. ३८. प्राधान्यक्रम Generate करणे, lock करणे इत्यादीबाबत उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
TAIT 2025 Pavitra Porta

TAIT 2025 Recruitment: आदिवासी विकास विभाग व पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पसंतीक्रम निर्मिती आणि लॉक करण्याबाबतची सूचना २०२६