⚠️ जुनी जाहिरात (History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 12-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 10-08-2026 23:36
📍 नोकरी ठिकाण: पुणे
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 16
💰 परीक्षा फी: (1) अमागास: 1000/- (2) मागासवर्गीय: 900 (3) माजी सैनिक: कोणतेही शुल्क नाही
📏 वयोमर्यादा: [As on 10-09-2026] (i) Gen: 18 To 38Y (ii) OBC: 18 To 41Y (iii) SC/ST: 18 To 43Yrs
📝 परीक्षा तारीख: Update नंतर दिला जाईल

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक (Assistant Government Document Examiner)रसायनशास्त्र (मुख्य विषय) आणि भौतिकशास्त्र (उपविषय) सह पदवी + न्यायसहाय्यक विज्ञान (Forensic Science)16
🔴 या बॅचची मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

महत्त्वाचे तपशील एका नजरेत (Quick Highlights) Maha CID Document Examiner Bharti-2026

  • एकूण जागा (Total Vacancies): १६ जागा (सरळसेवा भरती)

  • नौकरीचे ठिकाण (Job Location): पुणे, महाराष्ट्र

  • अर्ज सुरू होण्याची तारीख (Online Registration Start Date): १२ ऑगस्ट २०२६ (सुरुवात)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply): १० सप्टेंबर २०२६ (रात्री २४:०० वाजेपर्यंत मुदतवाढ)

  • परीक्षा दिनांक (Exam Date): लवकच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल

  • परीक्षा शुल्क (Application Fee): नियमानुसार (ऑनलाइन भरताना डेबिट कार्डवर ०.४०% MDR शुल्क लागू)

पदानुसार तपशील, वयोमर्यादा व शिक्षण (Vacancy, Age & Education Table)

पद / विभाग (Position / Department) एकूण जागा (Vacancies) वयोमर्यादा (Age Limit – As on 10/09/2026) आवश्यक शिक्षण  वेतनमान / सविस्तर माहिती
सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक (Assistant Government Document Examiner) १६

• खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे

 

• मागासवर्गीय: १८ ते ४३ वर्षे

 

• अंशकालीन: १८ ते ५५ वर्षे

रसायनशास्त्र (मुख्य विषय) आणि भौतिकशास्त्र (उपविषय) सह पदवी + न्यायसहाय्यक विज्ञान (Forensic Science) महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वेतनश्रेणी व सुधारित परीक्षा पद्धती लागू

परीक्षेचे सुधारित स्वरूप (Revised Exam Pattern)

सुधारित शुद्धिपत्रकानुसार सदर परीक्षा दोन स्वतंत्र भागांत (पेपर-I आणि पेपर-II) ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने घेतली जाईल:

  1. पेपर-I (१२० गुण – ६० प्रश्न – ६० मिनिटे):

    • यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील (प्रत्येक प्रश्नाला २ गुण).

    • पेपर-I मध्ये किमान ४५% गुण मिळवणारे उमेदवारच पेपर-II साठी पात्र ठरतील.

  2. पेपर-II (८० गुण – ४० प्रश्न – ६० मिनिटे):

    • व्यावसायिक चाचणी परीक्षा ज्यामध्ये रसायनशास्त्र (मुख्य विषय – २० गुण / १० प्रश्न), भौतिकशास्त्र (उपविषय – २० गुण / १० प्रश्न) आणि न्यायसहाय्यक विज्ञान (४० गुण / २० प्रश्न) विचारले जातील.

    • दोन्ही पेपरमधील एकत्रित गुणांच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.

महत्ची टीप: ज्या उमेदवारांनी यापूर्वी आधीच्या जाहिरातीनुसार परीक्षा शुल्कासह अर्ज केला आहे, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी व अभ्यासक्रमासाठी अधिकृत संकेतस्थळ www.mahacid.gov.in ला भेट द्या.

Maha CID Document Examiner Bharti-2026


महत्त्वाच्या अटी व शर्ती (Important Rules & Conditions)

  1. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate): उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असून ते अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वीचे असावे.

  2. आर्थिक दुर्बल घटक व राखीव प्रवर्ग (Non-Creamy Layer & EWS):

    • एसबीसी, विजाअ, भटके विमुक्त (ब, क, ड) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६ या आर्थिक वर्षातील किंवा ११/०३/२०२६ रोजीपर्यंतचे अथवा पुढील आर्थिक वर्षाचे वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

  3. समानांतर आरक्षण (Parallel Reservation): प्रकल्पग्रस्त, भूकंपाग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर किंवा माजी सैनिक यांपैकी एकाच समांतर आरक्षणाचा लाभ घेता येईल. एकापेक्षा जास्त लाभ घ्यायचा असल्यास प्राधानक्रम ठरवून देणे आवश्यक आहे.

  4. चुकीची माहिती व कायदेशीर कारवाई: अर्जात कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज रद्द केला जाईल आणि भारतीय न्याय संहिता कलम १९९ व २३६ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

  5. आरोग्य व चारित्र्य पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांची चारित्र्य आणि पूर्व आयुष्य पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी (सख्त शरीरयष्टी व निर्दोष दृष्टी) झाल्यानंतरच नियुक्ती केली जाईल. न्यायालयीन खटला प्रलंबित असलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळणार नाही.

  6. कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र: महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ नुसार लहान कुटुंब असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

  7. महत्त्वाचे संपर्क क्रमांक:

    • तांत्रिक अडचण असल्यास: 022-61087557

    • जाहिरात संदर्भातील अडचण असल्यास (हेल्पलाईन): 020-25638444 (वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)

Maha CID Document Examiner Bharti-2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

Maha CID Document Examiner Bharti-2026