📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| प्राध्यापक (Professor) | संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) आणि NMC नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. | 5 |
| सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) | संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) आणि NMC नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. | 2 |
| सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) आणि NMC नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. | 8 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
भरतीची मुख्य माहिती: GMC Chandrapur Recruitment 2026 Bharti
-
एकूण जागा (Total Vacancies): एकूण १५ पदे
-
प्राध्यापक (Professor): ५ पदे
-
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): २ पदे
-
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): ८ पदे
-
-
शिक्षण (Qualification): संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) आणि NMC नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव.
-
वयोमर्यादा (Age Limit):
-
प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक: कमाल ७० वर्षांपर्यंत.
-
सहाय्यक प्राध्यापक: खुला प्रवर्ग ३८ वर्षे, मागास प्रवर्ग ४३ वर्षे.
-
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): चंद्रपूर, महाराष्ट्र.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ जुलै २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत).
-
मुलाखत तारीख (Interview Date): ०४ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:३० वाजता).
- मुलाखत ठिकाण: ‘अधिष्ठाता कार्यालय, कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर‘
-
अर्ज शुल्क (Fee): २०० रुपये (प्रत्येक पदासाठी).
महत्त्वाच्या सूचना:
-
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून, पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ‘अधिष्ठाता कार्यालय, कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर’ येथे प्रत्यक्ष किंवा नोंदणीकृत डाकेने सादर करावा.
-
मानधन:
-
प्राध्यापक: २,००,०००/- रुपये दरमहा.
-
सहयोगी प्राध्यापक: १,८५,०००/- रुपये दरमहा.
-
सहाय्यक प्राध्यापक: १,१०,०००/- रुपये दरमहा.
-
-
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे.
-
कालावधी: सदर नियुक्ती ३६४ दिवसांच्या करार तत्त्वावर (Contract Basis) असेल.
-
महत्त्वाचे: अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) सादर करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला (
www.gmcchandrapur.org) भेट द्यावी.
‘नियम व अटी’ खालीलप्रमाणे आहेत:
-
करार कालावधी: नियुक्तीचा कालावधी नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत किंवा ३६४ दिवसांपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत असेल. नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास आयुक्तांना कंत्राटी उमेदवाराच्या पदस्थापनेत बदल करण्याचे अधिकार असतील.
-
शिस्त व कामकाज: समाधानकारक कामकाज नसल्यास किंवा गैरवर्तणूक आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती समाप्त केली जाईल. नियुक्त उमेदवाराने अध्यापन, रुग्णसेवा व अधिष्ठाता यांनी नेमून दिलेली कामे करणे आवश्यक आहे.
-
खाजगी व्यवसाय: महाविद्यालयीन कामावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची मुभा असेल.
-
हक्क व लाभ: करार पध्दतीने नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही आणि हा कालावधी कोणत्याही सेवा प्रयोजनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
-
रजा: नियुक्त उमेदवारास सेवा कालावधीत केवळ नैमित्तिक रजा अनुज्ञेय असतील.
-
गोपनीयता व अधिकार: उमेदवारांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे. त्यांना कोणतेही प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान केले जाणार नाहीत.
-
सेवा सोडण्याबाबत: नियुक्तीनंतर किमान एक शैक्षणिक सत्र संपेपर्यंत सेवा सोडता येणार नाही आणि तशा आशयाचे शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शैक्षणिक सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी राजीनामा स्वीकारला जाणार नाही.
-
नियमित नियुक्ती: बिगर सेवानिवृत्त गटातील उमेदवाराची नंतरच्या काळात नियमित नियुक्ती झाल्यास, त्याला पूर्वीच्या कंत्राटी सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
-
वैद्यकीय प्रमाणपत्र: अर्जदाराने संबंधित पदासाठी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
-
अधिकार: जाहिरातीतील पदसंख्या बदलण्याचे किंवा जाहिरात रद्द करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
-
निवड प्रक्रिया: निवडीसाठी दबाव आणल्यास उमेदवाराला प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
-
नोंदणी प्रमाणपत्र: महाराष्ट्र वैद्यकीय मंडळ अधिनियम १९६५ अंतर्गत कायम नोंदणी केल्याबाबतचे किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेचे कायम नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
-
मुलाखत: मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि ऑनलाइन सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
GMC Chandrapur Recruitment 2026 Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

GMC Chandrapur Recruitment 2026: कर्मवीर एम.एस. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती, चंद्रपूर