📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
महत्त्वाची सूचना: TET परीक्षा २०२६ पुढे ढकलली! 🚨
MAHA TET 2026 Exam Postponed : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आली आहे.
🔹 कारण: भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेबाबत संशयास्पद माहिती मिळाल्याने पोलीस तपास सुरू आहे.
🔹 पुढील दिशा: परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व्हावी, यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
🔹 अपडेट्स: परीक्षेबाबतची पुढील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.mscepune.in) प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे!
MAHA TET 2026 Exam Postponed जाहीर प्रगटन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकूण १०२८ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या.
तथापि, आज दि. २७ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास, गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिसांनी सदर ठिकाणी धाड घातली. त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता, दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी, हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक पात्रता (TET) परीक्षेबाबतची पुढील अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. https://mahatet.in/
– आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
१. TET परीक्षा २०२६ का पुढे ढकलण्यात आली आहे? उत्तर: भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेबाबत संशयास्पद प्रकार आढळून आल्याने आणि पारदर्शकतेसाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
२. नवीन परीक्षेची तारीख काय आहे? उत्तर: नवीन तारखेबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
३. अधिकृत माहिती कोठे मिळेल? उत्तर: अधिकृत माहितीसाठी www.mscepune.in या वेबसाइटला भेट द्या.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

MAHA TET (शिक्षक पात्रता परीक्षा) २०२६ स्थगित! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय