ZP Pune Bharti 2026: आरोग्य सेवक (पुरुष) ४०% अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध; येथे पहा तुमचे नाव
खालील ‘Get List‘ वर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल पाहू शकता:
पुणे जिल्हा परिषद: आरोग्य सेवक (पुरुष) ४०% अतिरिक्त निवड यादी २०२६
ZP Pune Arogya Sevak Additional Selection List 2026 Out पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभागांतर्गत सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ ची अतिरिक्त निवड यादी (Additional Selection List) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी आरोग्य सेवक (पुरूष) ४०% या संवर्गासाठी असून, रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा
कागदपत्र पडताळणी तपशील (Document Verification Details)
निवड यादीतील पात्र उमेदवारांनी खालील वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे अनिवार्य आहे:
-
तारीख: १८ मे २०२६ आणि १९ मे २०२६
-
वेळ: सकाळी १०:०० वाजता
-
ठिकाण: जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण सभागृह, पाचवा मजला, पुणे कॅम्प, पुणे ४११००१.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार खालील गोष्टी सोबत ठेवाव्यात: १. सर्व मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे / पुरावे. २. सर्व कागदपत्रांच्या २ छायांकित (Xerox) प्रती
खालील थेट लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण १०३ उमेदवारांची यादी आणि अधिकृत सूचना पाहू शकता:
