⚠️ जुनी जाहिरात ( Old History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., (अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा:) Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 25-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 01-09-2026 17:00
📍 नोकरी ठिकाण: -
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: -
💰 परीक्षा फी: (i) फक्त पेपर -I किंवा पेपर–II (1) Gen/OBC: 1000/- (2) SC/ST/Pwd: 500/- (ii) पेपर – I व पेपर -II: (1) Gen/OBC: 1200/- (2) SC/ST/Pwd: 600/-
📏 वयोमर्यादा: उल्लेख नाही.
📝 परीक्षा तारीख: Update नंतर दिला जाईल

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
इयत्ता १ ली ते ५ वी - पेपर I(१२ वी): किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षांचा (D.El.Ed/D.T.Ed) पूर्ण किंवा अंतिम वर्षात. /किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि B.Ed. पूर्ण (NCTE च्या नियमांनुसार काही अटी लागू)-
इयत्ता ६ वी ते ८ वी - पेपर IIपदवी पूर्ण आणि २ वर्षांचा Diploma in Elementary Education पूर्ण किंवा अंतिम वर्षात. (ii) B.El.Ed किंवा B.A./B.Sc.Ed-
🔴 मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

CTET 2026 अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू – अर्ज करण्याची सुवर्णसंधी!

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाकडून (CBSE) CTET 2026 (22 वी आवृत्ती) साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ज्या उमेदवारांना आधी अर्ज करता आला नव्हता, त्यांना आता पुन्हा संधी देण्यात आली आहे. CTET September 2026 Notification Online Form Eligibility

  • अर्ज सुरू होण्याचा दिनांक: २५ ऑगस्ट २०२६

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ सप्टेंबर २०२६

  • टीप: ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.


शिक्षक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) सप्टेंबर 2026 साठीची अधिकृत माहिती पुस्तिका (Information Bulletin) प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 मे 2026 पासून सुरू झाली आहे.

खाली या परीक्षेसंबंधी सर्व महत्त्वाची माहिती सविस्तर दिली आहे:

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 मे 2026      २५ ऑगस्ट २०२६

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:  10 जून 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)        १ सप्टेंबर २०२६

  • परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 10 जून 2026

  • ऑनलाईन अर्जात सुधारणा करण्याची मुदत: 15 जून ते 18 जून 2026

  • परीक्षा दिनांक: 06 सप्टेंबर 2026 (रविवार)

  • निकाल घोषणा (अंदाजित): ऑक्टोबर 2026 च्या अखेरीस


१. प्राथमिक स्तर (Primary Stage: इयत्ता १ ली ते ५ वी – पेपर I)

ज्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक व्हायचे आहे, त्यांच्याकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:

  • Senior Secondary (१२ वी): किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षांचा Diploma in Elementary Education (D.El.Ed/D.T.Ed) पूर्ण किंवा अंतिम वर्षात.

  • अथवा स्नातक (Graduation): किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि B.Ed. पूर्ण (NCTE च्या नियमांनुसार काही अटी लागू).

  • आरक्षित प्रवर्ग सवलत: SC/ST/OBC आणि दिव्यांग उमेदवारांना किमान पात्रता गुणांमध्ये ५% सवलत दिली जाते.

२. माध्यमिक स्तर (Elementary Stage: इयत्ता ६ वी ते ८ वी – पेपर II)

ज्या उमेदवारांना इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक व्हायचे आहे, त्यांच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:

  • स्नातक (Graduation): पदवी पूर्ण आणि २ वर्षांचा Diploma in Elementary Education पूर्ण किंवा अंतिम वर्षात.

  • किंवा पदवी (Graduation/Post-Graduation): किमान ५०% गुणांसह आणि १ किंवा २ वर्षांचा B.Ed. कोर्स पूर्ण किंवा अंतिम वर्षात.

  • ४ वर्षांचा कोर्स: ४ वर्षांचा B.El.Ed किंवा B.A./B.Sc.Ed पूर्ण केलेले उमेदवार देखील पात्र आहेत.

CTET September 2026 Notification Online Form Eligibility


काही महत्त्वाचे नियम (महत्वाच्या नोट्स):

  • Appearing Candidates: जे उमेदवार त्यांच्या शिक्षक प्रशिक्षण कोर्सच्या (D.El.Ed/B.Ed) अंतिम वर्षात आहेत, ते देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

  • नोंदणीकृत मोबाइल आणि ईमेल: अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा सक्रिय मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरणे बंधनकारक आहे, कारण सर्व अलर्ट त्यावरच पाठवले जातात.

  • दहावीच्या प्रमाणपत्राचा वापर: उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख ही दहावीच्या (Class X) बोर्ड प्रमाणपत्राप्रमाणेच भरणे आवश्यक आहे.

  • पात्रतेची पडताळणी: केवळ परीक्षेस बसू दिले म्हणजे तुम्ही पात्र आहात असे नाही. तुमच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी ही शिक्षक भरतीवेळी संबंधित विभागामार्फत केली जाते.

    फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा


परीक्षेचे वेळापत्रक (Examination Schedule)

सत्रपेपरवेळकालावधी
सकाळपेपर-II (इयत्ता 6 वी ते 8 वी)सकाळी 09:30 ते दुपारी 12:00

2.5 तास

दुपारपेपर-I (इयत्ता 1 ली ते 5 वी)दुपारी 02:30 ते सायंकाळी 05:00

2.5 तास


परीक्षा शुल्क (Examination Fee)

शुल्क ऑनलाईन पद्धतीने (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग) भरायचे आहे.

  • सामान्य/OBC (NCL): एका पेपरसाठी 1000 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये.

  • SC/ST/दिव्यांग व्यक्ती: एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये.

पात्रता निकष (Eligibility)

CTET परीक्षेसाठी बसण्याकरिता किमान शैक्षणिक पात्रता NCTE (National Council for Teacher Education) च्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

  • आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/दिव्यांग) उमेदवारांना किमान गुणांमध्ये 5% पर्यंत सवलत दिली जाते.

परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQs) असतील.

  • प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही.

  • एकूण 150 प्रश्न आणि 150 गुणांची परीक्षा असेल.

  • प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असेल.


ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

  1. CTET च्या अधिकृत वेबसाईट https://ctet.nic.in वर लॉग इन करा.

  2. “Apply Online” लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.

  3. अर्ज भरताना रजिस्ट्रेशन नंबर/ॲप्लिकेशन नंबर नोंदवून ठेवा.

  4. स्कॅन केलेला फोटो (10-100 KB) आणि स्वाक्षरी (3-30 KB) अपलोड करा.

  5. परीक्षा शुल्क भरा आणि ‘Confirmation Page’ ची प्रिंट काढून ठेवा



नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q.1: CTET प्रमाणपत्र किती काळासाठी वैध आहे?

Ans: CTET पात्रतेचे प्रमाणपत्र आता आयुष्यभरासाठी (Lifetime) वैध असेल.

Q.2: परीक्षेसाठी किती वेळा बसता येते?

Ans: परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्नांची (Attempts) कोणतीही मर्यादा नाही.

Q.3: परीक्षेसाठी पेन स्वतः न्यायचा आहे का?

Ans: होय, उमेदवारांना स्वतःचा काळा किंवा निळा ‘Ball Point Pen’ सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

Q.4: अर्जात सुधारणा करता येईल का?

Ans: होय, 15 जून ते 18 जून 2026 या कालावधीत अर्जात सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध असेल.


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.


Laduli.in (लाडुली नोकरी सर्च पोर्टल) वर आमचा प्रयत्न असतो की, तुम्हाला सर्व सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी आणि अचूक मिळावी. CTET सप्टेंबर २०२६ ही शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आम्ही वर दिलेल्या सर्व माहितीची खात्री अधिकृत नोटिफिकेशनद्वारे केली आहे, तरीही उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी एकदा अधिकृत माहिती पत्रक (Information Bulletin) काळजीपूर्वक वाचावे.