- महाराष्ट्रात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली.
- NH6 हा राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तर MH- 4C हा राज्यांतर्गत सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
- भारतात महाराष्ट्रात पहिला लोहमार्ग 1853 मध्ये सुरू झाला.
- महाराष्ट्रात कोकण रेल्वे ची लांबी 382 की. मी आहे.
- पानवेल नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल आहे.
- शरावती नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात लांब पूल आहे.
- न्हावाशेवा (रायगड) हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणीकृत झालेले बंदर आहे.
- महाराष्ट्रात रेल्वेचे दोन विभाग आहेत. १) मध्य रेल्वे — मुंबई ( CST). २) पश्चिम रेल्वे – मुंबई ( चर्चगेट)
- नव्हशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
- मुंबई – आग्रा मार्गावर कसारा घाट आहे.
- भारतात (महाराष्ट्र) टपाल सेवा १८३७ मध्ये सुरू झाली.
- भारतात टपाल खात्याची स्थापना १८५४ मध्ये झाली.
- देशातील पहिले उपग्रह दळणवळण केंद (विक्रम) आर्वी, जी. पुणे येथे १७७१ साली सुरू झाले.
- भारतातील ( महाराष्ट्रातील) पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे आहे.
- भारतात दूरदर्शन सेवा सर्वप्रथम दिल्ली येथे १९५९ मध्ये सुरू झाली.
- आर्यभट्ट हा अवकाशात सोडलेला पहिला भारतातील उपग्रह आहे.
- राज्यात २ ऑक्टोंबर. १९७२ रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १८७५ मध्ये टेलिफोन चा शोध लावला.
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ – मुंबई – ठाणे – नाशिक – धुळे – आग्रा
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – मुंबई – पुणे – सातारा – कोल्हापूर – बंगरुळु – चेन्नई
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ – न्हावसेवा – कळंबोली – पळस्पे – (२७ की. मी)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ – हाजिर – सुरत – धुळे – अकोला – नागपूर – कोलकाता ( सर्वात मोठा)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ – वारसानी – जबलपूर – नागपूर – हैदराबाद – बंगरुळू – कन्याकुमारी – ( भारतातील सर्वात मोठा)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ – मुंबई – अहमदाबाद – जयपूर – दिल्ली –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ – पुणे – सोलापूर – हैदराबाद – विजयवाडा ( आंध्र प्रदेश)
राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ – सोलापूर – विजापूर – चित्रदुर्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ – निजामाबाद – जगदलपुर (छत्तीसगड)
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७. – पनवेल – पेण – महाड – चिपळूण – गोवा – मंगलोर
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० – पुणे – नाशिक
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ – नागपूर – अब्दुलागंज (मध्य प्रदेश)
राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ – रत्नागिरी – कोल्हापूर
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ – सोलापूर – धुळे
राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ – कल्याण – निर्मल (आंध्र – प्रदेश)
