माणूस नावाच्या सजीवात
मन नावाचा कोपरा वसतो
असंख्य गोष्टींचा दडलेला येथे
खजिना असतो
काही स्वप्नं अपूर्ण असल्याचा
गंध येथे दरवळतो
आठवणींचा खेळ रोज चालू असतो
याच खेळात स्वतःलाच मात्र
हरवून बसतो
पर्वा नसते कुणाला याची
जो-तो आपली गरज
भागवत असतो
मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या
हिंदोळ्यावर जगत बसतो
समजून घेण्यास कठीण असला
तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो.