तू माझ्या मिठीत याव, अशी इच्छा मुळीच नाही
तू नेहमी समोर असावं, यात काही वावगं नाही
हेवेदावे दूर व्हावेत तूझ्या – माझ्या मनातले
प्रेमच व्हावं एकमेकांवर, अस काही नाही
कधी असशील गडबडीत, कधी मला वेळ नसेल
रोजच भेट व्हावी आपली, असही काही नाही
तू पहावंस मला, मी तुला नजरेत टिपाव
न बोलता समजेल सार, संवादच व्हावा असं काही नाही
साठवले आहेत मनात कितीतरी क्षण तुझ्यासवे
सांगावस वाटत सगळं, पण सांगावच अस काहीं नाही
तुझं नाव घेताना अधर थरथरतात हलकेच
म्हणून भीती आहे मनात माझ्या असे मुळीच नाही….