लाडकी बहीण  e-KYC Updated.

 

ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते.

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Ladki Bahin E-KYC Update

e-KYC येथे क्लिक करा.

नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खुशखभर आहे. मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. आता नवीन मुदतवाढ तारीख 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या, e-KYC प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. नवीन निर्देशानुसार ही मुदत 31 मार्च 2026 वाढवण्यात आली आहे. अनेक पात्र महिलांची e-KYC प्रक्रिया OTP समस्येमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. नवीन मुदत मिळाल्याने कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. e-KYC करताना आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आधार-लिंक मोबाइलवर OTP येतो.

हा OTP टाकल्यानंतर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नाहीये आणि त्यामुळेच अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आता मुदतवाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. तरी ज्यांची e-Kyc केलेली नाही त्यांनी मुदत संपण्याच्या अगोदर करून घेवे.

खालील लिंक वर क्लिक करुन आपली e-KYC करून घ्यावी.

e-KYC येथे क्लिक करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

 

Official Website:

https://ladakibahin.maharashtra.gov.in/