1. ही सेवा भारताच्या करपात्र प्रदेशात प्रदान करण्यात आली होती किंवा प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते.
2. ही एक अशी सेवा आहे जी एका व्यक्तीने/संस्थेद्वारे दुसर्याला प्रदान केली जाईल किंवा प्रदान करण्याचे वचन दिलेले असते.
3. ही सेवा नकारात्मक यादी शी संबंधित नाही किंवा यादीतून सूट वगळलेल्या विशेष सेवा पैकी एक आहे.
सेवा कराचा दर किती आहे
१). सेवा कराची गणना वैयक्तिक सेवा प्रदात्यां साठी रोख आधारावर आणि कंपन्यांसाठी जमा आधारावर केली जाते. प्रदान केलेल्या सेवांचे वार्षिक मूल्य १० लाखांपेक्षा जास्त असेल तेव्हा ते देय आहे.
२). सेवा कराचा दर बदलू शकतो. कर दर निश्चित करण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाची असते आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुधारित दराची घोषणा केली जाते.
३). देशातील नवीनतम सेवा कर दर १५% आहे, ज्यात ०.५%’कृषी कल्याण’ उप कर आणि ०.५ % ‘स्वच्छ भारत’ उप कर समाविष्ट आहे. हा दर २०१५ मध्ये १२.३६% वरून १४% आणि २०१६ मध्ये १५% पर्यंत वाढला.
४). सेवांच्या तरतुदि पावतिच्या विरूद्ध देय किंवा प्राप्त केलेल्या फी च्या टक्केवारीच्या रूपात कर मोजला जातो, विशिष्ट सूट सह सवलतीची काही उदाहरणे म्हणजे हवाई वाहतूक शुल्लक ६०% सूट, चिट फंड वर ३०% सूट आणि ट्रॅव्हल ऑपरेटर द्वारे ऑफर केलेल्या काही सेवांवर ७०% सूट म्हणून, कराची गणना फक्त उरलेल्या रकमेवर च केली जाते.
★★★★★
टपलसेवा
१७६६ – लॉर्ड क्लाइव्हने टपालव्यवस्थेचा पाया घातला.
१८३७ – आखिल भारतीय पोस्ट सेवा सुरू.
१८५२ – देशातील पहिले पोस्टचे तिकीट कराची येथे वितरित.
१८५४ – पोस्ट ऑफिस कायदा संमत.
१८७४ – जगातील टपाल संघटनेची स्थापना – बर्न (स्विझरलँड)
१८८० – पोस्ट खात्यामार्फत मनीऑर्डर सेवा सुरू.
१८९८ – भारतीय टपाल कार्यक्रम अधिनियम संमत.
१९७२ – देशात पिनकोड पद्धती सुरू.
१९८६ – देशात स्पीड पोस्ट सेवा सुरू.
२००२ – महाईत पोस्ट कार्ड सेवा सुरू.
२००४ – ई – पोस्ट सेवा सुरू.
तारसेवा
१८४४ – जगातील पहिली तारसेवा – वॉशिंग्टन ते बल्हिमोर या ठिकाणी सुरू झाली.
१८५१ – भारतातील पहिली तारसेवा – कोलकता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू झाली.
२०१३ – तारसेवा बंद करण्यात आली आहे.
दूरध्वनी सेवा
१८७५ – टेलिफोनचा शोध – अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावला.
१८८१ – कलकत्ता येथे भारतातील पहिली टेलिफोन सेवा सुरू झाली.
१८८२ मुंबई येथे देशातील पहिले दूरध्वनी केंद्र सुरू झाले.
१९४३ – दूरध्वनी सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
१९६० – देशात एस. टी. डी. सेवा सुरू करण्यात आली.
२००० – BSNL ची स्थापना.
- दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
- सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरी लाटा ही पारंपरिक ऊर्जासाधने आहेत.
- मुंबईजवळ मुबई हाय येथे भारतातील सर्वात जास्त खनिज तेलसाठा आहे.
- अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
- तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे.
- जैतापूर हे महाराष्ट्रातील नियोजित अणुऊर्जा केंद्र आहे.
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खपोली (जिल्हा रायगड) येथे उभारले आहे.
8. डॉ. होमी भाभा हे भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे जनक आहेत.
9. पालघर जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे राज्यातील पहिला पवमफर्म उभारण्यात आले आहे.
10. कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्पास गोवा राज्याचे सहकार्य लाभले आहे.
11. अँथ्रसाईट हा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे.
12. अँथ्रसाईट कोळस्यामध्ये कार्बन चे प्रमाण सर्वात जास्त असते तर पिट कोळशा मध्ये कार्बन सर्वात कमी प्रमाणात असते.
******
- महाराष्ट्रात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली.
- NH6 हा राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तर MH- 4C हा राज्यांतर्गत सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
- भारतात महाराष्ट्रात पहिला लोहमार्ग 1853 मध्ये सुरू झाला.
- महाराष्ट्रात कोकण रेल्वे ची लांबी 382 की. मी आहे.
- पानवेल नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल आहे.
- शरावती नदीवर कोकण रेल्वेवरील सर्वात लांब पूल आहे.
- न्हावाशेवा (रायगड) हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणीकृत झालेले बंदर आहे.
- महाराष्ट्रात रेल्वेचे दोन विभाग आहेत. १) मध्य रेल्वे — मुंबई ( CST). २) पश्चिम रेल्वे – मुंबई ( चर्चगेट)
- नव्हशेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
- मुंबई – आग्रा मार्गावर कसारा घाट आहे.
- भारतात (महाराष्ट्र) टपाल सेवा १८३७ मध्ये सुरू झाली.
- भारतात टपाल खात्याची स्थापना १८५४ मध्ये झाली.
- देशातील पहिले उपग्रह दळणवळण केंद (विक्रम) आर्वी, जी. पुणे येथे १७७१ साली सुरू झाले.
- भारतातील ( महाराष्ट्रातील) पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे आहे.
- भारतात दूरदर्शन सेवा सर्वप्रथम दिल्ली येथे १९५९ मध्ये सुरू झाली.
- आर्यभट्ट हा अवकाशात सोडलेला पहिला भारतातील उपग्रह आहे.
- राज्यात २ ऑक्टोंबर. १९७२ रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १८७५ मध्ये टेलिफोन चा शोध लावला.
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ – मुंबई – ठाणे – नाशिक – धुळे – आग्रा
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ – मुंबई – पुणे – सातारा – कोल्हापूर – बंगरुळु – चेन्नई
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ – न्हावसेवा – कळंबोली – पळस्पे – (२७ की. मी)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ – हाजिर – सुरत – धुळे – अकोला – नागपूर – कोलकाता ( सर्वात मोठा)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ – वारसानी – जबलपूर – नागपूर – हैदराबाद – बंगरुळू – कन्याकुमारी – ( भारतातील सर्वात मोठा)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ – मुंबई – अहमदाबाद – जयपूर – दिल्ली –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ – पुणे – सोलापूर – हैदराबाद – विजयवाडा ( आंध्र प्रदेश)
राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ – सोलापूर – विजापूर – चित्रदुर्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ – निजामाबाद – जगदलपुर (छत्तीसगड)
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७. – पनवेल – पेण – महाड – चिपळूण – गोवा – मंगलोर
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० – पुणे – नाशिक
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ – नागपूर – अब्दुलागंज (मध्य प्रदेश)
राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ – रत्नागिरी – कोल्हापूर
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ – सोलापूर – धुळे
राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ – कल्याण – निर्मल (आंध्र – प्रदेश)
१). सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तर – दक्षिण असा पसरलेला आहे. येथे उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडे वाहत जातात तसेच सातपुडा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर यांचा ही जलविभाजक आहे.
२). महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यात गोदावरी, कृष्ण, भीमा, पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. या नद्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात.
३). गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिची महाराष्ट्रातील लांबी ६६८ की. मी. आहे व ती सर्वात जास्त जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे.
४). संगमनेरा व नेवासा ही ठिकाणे प्रवरा नदीच्या काठावर वसली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहीली.
५). गोदावरी नदीवर गंगापूर (नाशिक) हे देशातील पहिले मातीचे धरण आहे.
६). जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात.
७). उजनी धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असे म्हणतात.
८). गोदावरीला दक्षिणेकडील गंगा असे म्हणतात.
९). भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातून वाहते.
१०). मुळा – नीरा यांचा संगम पुणे येथे होतो. या नद्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमेला मिळतो.
११). भीमा – नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यात नीरा – नरसिंगपूर येथे झाला आहे.
१२). महादेव डोंगरांनी भीमा व कृष्णा नद्यांचे पात्र वेगळे झालेले आहे.
१३). सरस्वती ही लृप्त नदी मनाली जाते.
१४). कृष्णा नदी ही सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते.
१५). कृष्णा व कोयना यांचा संगम कऱ्हाड येथे होतो त्यास प्रतिसंगम असे म्हणतात.(यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ)
१६). कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी नगर असे म्हणतात.
१७). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.
१८). वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.
१९). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.
२०). पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.
२१). वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, ती गडचिरोली जिल्ह्यात आहे.
२२). नर्मदा, तापी व कोकणातील सर्व नद्या पश्चिमेकडून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात.
२३). तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ती सर्वात लहान पश्चिम वाहिनी नदी आहे.
२४). उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. (१३० की. मी)
२५). वैतरणा नदीवर मोडकसागर प्रकल्प आहे.
२६). वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे.
२७). अंबी ही मुद्रा नदीची उपनदी आहे.
२८). महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)
२९) महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा – रत्नागिरी
३०). भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला राज्य – गुजरात
****** Read More
पहिले संविधान विशोधन (१९५१)
संविधानाच्या पहिल्या विशोधनाने काही राज्यांनी मंजूर केलेले जामीन सुधारणा कायदे जमीनदारी निर्मूलन विषयक कायद्यांना संरक्षण दिले. त्यासाठी संविधानाला ९ वी अनुसूची जोडून त्यात हे भुसुधार कायदे समाविष्ट केले आणि त्या अनुसूचितील सर्व कायदे न्यायिक पूर्विलोकापासून मुक्त ठेवले.
प्रसूत्त विशोधनाने ३१ क आणि ३१ ग ही नवीन कलमे संविधानात समाविष्ट करून संपत्तीचा अधीकार सीमित केला.
९ वे संविधान विशोधन (१९६०)
भारत पाक करार दरम्यानुसार (१९५८) बेरुबारी संघाचा ( पश्चिम बंगालमधील) भारतीय भूप्रदेश पाकिस्तान मध्ये विलीन केला.
१० वे संविधान विशोधन (१९६१)
दादरा नागरहवेलि हे भाग भारतात आले.
१२ वे संविधान विशोधन ( १९६२)
गोवा दिव दमन हे भाग भारतात आले.
२४ वे संविधान विशोधन (१९७१)
फेब्रुवारी १९६७ च्या गोलखनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कात विशोधन करण्याचा संसदेचा हक्क नाकारला व संसदेचे अधिकार सोमित केले.
प्रस्तुत विशोधनाने संविधानाच्या कोणत्याही भागात मूलभूत हक्कतही) विशोधन करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार वापरू शकणार नाही हे या घटनादुरुस्ती ने स्पष्ट केले.
२६ वे संविधान विशोधन (१९७१)
प्रस्तुत विशोधनाने माजी संस्थानिकांचे तणखे व विशेष हक्क रद्द करण्यात आले.
३१ वे संविधान विशोधन ( १९७३)
लोकसभेवर २ अँग्लो इंडियाची तरतुद करण्यात आली.
३५ वे संविधान विशोधन (१९७५)
सिक्कीमला भारतीय संघ राज्य अंतर्गत सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला.
३६ वे संविधान विशोधन (१९७५)
प्रसूत्त विशोधनाने सिक्कीमचा भारतात समावेश करून सिक्कीमला भारतीय संघराज्याचे २२ वे घटक राज्ये म्हणून स्वीकार केला.
३७ वे संविधान विशोधन (एप्रिल १९७५)
अरुणाचल प्रदेशाला विधानसभा व मंत्री परिषद स्थापन करण्याची परवानगी दिली.
३९ वे संविधान विशोधन (१९७५)
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय सभापती यांच्या निवडणुकी संबंधी तक्रारी/ वाद उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अधीकार क्षेत्रातून काढून संसदेने नेमलेल्या मंडळाच्या अधिकारात ठेवण्यात आले.
१९७५ ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या सिद्ध कारणावरून श्रीमती इंदिरा गांधीजी निवडणूक रद्द ठरविली होती. हा संदर्भ या घटनादुरुस्तीला होता हे काही लपून राहिले नाही.
४२ वे संविधान विशोधन (१९७६)
प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी या शब्दांची भर घातली.
नागरिकांसाठी १० मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.”
संसद आणि राज्यविधानसभांचा कार्यकाळ ६ वर्ष करण्यात आला.
४४ वे संविधान विशोधन (१९७७)
संपत्तीचा मूलभूत अधीकार रद्द करण्यात आला.
आता संपत्तीचा अधीकार कायदेशीर करण्यात आला. मूलभूत हक्क नाही.
प्रधानमंत्री, राष्ट्रपती इत्यादीच्या निवडणुकीचे तंटे निकालात काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला.
मंत्रिमंडळचा सल्ला स्वीकारण्यापूर्वी एकदा तो फेरविचारार्थ पाठविण्याच अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त झाला.
राष्ट्रपती मंत्रिमंडळाला दिलेल्या सल्ल्यावर पुनर्विचार करण्यास एकदा सांगू शकतात. परंतू पुनर्विचारानंतर मंत्री मंडळ राष्ट्रपतीला करावा लागेल.
लोकसभा व विधानसभा कार्यकाळ पुन्हा पाच करण्यात आला.
आणीबाणी लागू करण्याबाबत अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव झालातरच आणीबाणी पुकारली जावी. असा बदल करण्यात आला
२५ जून १९७५ ला श्रीमती इंदिरा गांधींनी मंत्री परिषदेचा सल्ला न घेता आणीबाणीची घोषित केली होती. या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेने आणीबाणीची गरज लेखी स्वरूपात कळविल्याशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही अशी तरतूद केली.
५२ वे संविधान विशोधन (जानेवारी १९८५)
पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला.
५३ वे संविधान विशोधन
केंदशासित प्रदेश मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला.
८४ वे संविधान विशोधन (२००२)
झारखंड, छत्तीसगड, उत्तरांचल या राज्यांची निर्मिती
८५ व संविधान विशोधन (२००२)
सरकारी नोकरीत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात आले.
८६ वे संविधान विशोधन (२००२)
संविधानात कलम २१ क चा समावेश करून ६ ते १४ वर्षाच्या बालकांना मोफत अनिवार्य शिक्षणाची तरतूद केली.
९१ वे संविधान विशोधन (२००३)
कलम ७५ व १६४ मध्ये बदल
मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या/ विधानसभेच्या सदस्य संख्येचा १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
९२ वे संविधान विशोधन (२००३)
आठव्या परिशिष्टात ४ नवीन समाविष्ट करण्यात आल्या.
१) बोडो
२) संथाली
३) मैथिली
४) दोग्री
आठव्या परिशिष्टात सध्या भाषांची संख्या २२ एवढी आहे.
९१ वे संविधान विशोधन
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ९९ वी घटनादुरुस्ती रद्द करून न्यायाधीश निवडीची जुनी कॉलेजियम पद्धत कायम ठेवली.
१०१ वे संविधान विशोधन ( २०१६) वस्तू व सेवा कर
ऑगस्ट २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात जी एस टी घटनादुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केले.
३१ पैकी १६ राज्य विधान सभेने जी एस टी विधेयकाला मंजुरी दिली.
राष्ट्रपतींनी जी एस टी विधेयकाला ८ सप्टेंबर २०१६ रोजी मंजुरी दिली.
१ जुलै २०१७ पासून जीएसटी ची अंमलबजावणी.
जी एस टी कर लागू झाल्यानंतर व्हॅट सह सर्व कर रद्द होणार आहेत. यामुळे करचुकव्यांना आळा बसणार आहे.
१२२ वे घटनादुरुस्ती विधेयक
******
