Job Details

 @ Join Our Channel …….


Thane Municipal Corporation Staff Nurse Recruitment/ठाणे महानगरपालिका स्टाफ नर्स 140 जागांसाठी भरती.

TMC Recruitment More Details:

Select language

 

 

SN Post Name Education vacancy
01 GNM Female BSc Nursing GNM Course With MNC Registration 66
02 GNM Male BSc Nursing GNM Course With MNC Registration 11
03 ANM ANM Course With MNC Registration 63
Table Plugin


Fees/शुल्क

  1. खुला प्रवर्ग: 750/-

  2. मागासवर्गीय: 500/-


शिक्षण

  1. BSc Nursing GNM Course With MNC Registration

  2. ANM Course With MNC Registration

वय:                        [As on 01-10-2025 ]

  1. Gen: 18 ते 38 वर्षे

  2. SC/ST: 18 ते 43 वर्षे

 

तुमचे वय मोजा.

Calculate Your Age According to Your Date:
Your Birth Date
To Date


Thane Municipal Corporation Staff Nurse Recruitment More Details:

Method of Application/ अर्ज करण्याची पद्धत: offline, online

The address to send the application is as follows/अर्ज पाठवण्याचा पत्ता खालीलप्रमाणे:

  1. सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी  पांचपाखाडी, , ठाणे  (प) 400 602,

येथे दिनांक २८/१०/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.


 

१)दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहील. नमुन्यात अर्ज सादर केला
नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.

२) अर्ज भरण्या बाबतच्या सूचना-

१. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित
कालावधीत भरणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्मलिंकhttps://forms.gle/PJCHHGIN५२bmowpe६
३) शैक्षणिक तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती तपशील –
अर्जदाराने सर्व शैक्षणिक/तांत्रिक /व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीची माहिती अर्जासोबत
स्वसाक्षांकित छायांकित कागदपत्रे जोडावीत.
1.शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा,
II.अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदाकरीता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता
धारण केलेली असणे आवश्यक आहे.
III.आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
(निकाल घोषीत केल्याचा दिनांक)
IV. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये
रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी त्यानुसार अर्जात गुणांची टक्केवारी
नमूद करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रत सादर करावी.
V. शैक्षणिक प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर
करण्यात येतील.
VI. अर्जात नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक अर्हतेबाबतची स्वयंसाक्षांकित केलेले छायांकित प्रमाणपत्रे कागदपत्रे
अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ कागदपत्रे सादर करणे.

अनिवार्य राहील. निवड प्रक्रियेच्या छाननी दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या गुणपत्रिका व अर्जामध्ये
नमूद केलेली माहिती न जुळल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
VII. कंत्राटी पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता पात्रता ही विद्यापीठ अनुदान आयोग (UGC
Approved) मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अशाच विद्यापीठातून
घेतलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता ग्राह्य धरण्यात येईल.
VII.ज्या वैद्यकीय निमवैद्यकीय पदांकरिता संबंधित वैद्यकीय निमवैद्यकीय परिषदेची नोंदणी अनिवार्य आहे.
अशा अर्जदारांनी संबंधित परिषदेकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे व आपण निवडीस
पात्र झाल्यास छाननी दरम्यान सादर करणे आवश्यक आहे.
४) अनुभवाचा तपशील अर्जदाराने सर्व अनुभवांचा तपशील अर्जासोबत नोंदवावा.
1.अर्ज करीत असलेल्या कंत्राटी पदाकरीता विहित केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचाच अनुभव
ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये.
त्या अनुभवाची दखल घेतली जाणार नाही.
II. अर्जामध्ये अनुभवाचा तपशील नमूद करताना सध्याचा नियुक्ती कालावधी ते पहिली नियुक्ती कालावधी
या क्रमानेच नमूद करावे.
III. अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे, अशाच
कार्यालयाचा तपशील अर्जामध्ये नमूद करावा. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात
येणार नाही, अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा.
IV. अनुभवाचा तपशील नमूद करताना रूजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा. दोनही
तारखा अनुभव प्रमाणपत्रानुसार नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास अशा अनुभवाचा
विचार करण्यात येणार नाही.
V. ज्या कंत्राटी पदाकरीता अर्ज केला आहे, त्या पदाशी संबंधित असलेला शासकीय निमशासकीय
अनुभवच ग्राह्य धरण्यात येईल.या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार
नाही.
५) कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे-
अर्जदाराने अर्जामध्ये नोंदविलेल्या माहितीसंबंधीचे सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तसेच शैक्षणिक
अर्हता/अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकित
प्रती ४ था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाचपखाडी येथे सादर करावयाची आहेत.
६) अर्ज शुल्क धनाकर्षद्वारे भरणे –
अर्जदाराने निवडलेल्या पदाच्या प्रमाणात शुल्काचा भरणा करावा.
1. उमदेवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणे बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गातील
उमेदवारांकरीता रु.750/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.500/- रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा
धनाकर्ष अर्ज शुल्क राहील.
II. धनाकर्ष पुढील नावे काढा.
“INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY”
III. वैध धनाकर्षाशिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

IV. अर्ज शुल्क ना परतावा (Non Refundable) आहे.
७) अर्जात दिलेल्या प्रत्येक मुदयाची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात भरावी. एकदा अर्ज सादर
करताना भरलेल्या माहितीत खाडाखोड करण्यात येवू नये, अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतेही
बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
८) वयोमर्यादा –
वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/ माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी)
उत्तीर्ण दाखला इ. ची स्वयंसाक्षांकितची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी.
1. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच ०१/१०/२०२५ रोजी उमेदवाराचे वय प्रत्येक कंत्राटी
पदाकरीता जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे.
11. उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग -४३ वर्षे.
III. राष्ट्रीय आरोग्य अभियानात सद्यस्थितीत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना वयोमर्यादा
शिथिलक्षम राहील.तथापि, कागदपत्रे पडताळणी दरम्यान सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कार्यालय
प्रमुखांच्या स्वाक्षरीचे तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. HR Policy नुसार वयोमर्यादा
खालीलप्रमाणे राहील.

 

अर्ज भरण्याबाबतच्या इतर सर्वसाधारण सुचना –
अर्ज सादर करीत असतांना आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या
स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती जोडव्यात, अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय
धरला जाणार नाहीत.
1.अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नाव बदल असल्यास
राजपत्र (Gazette) कागदपत्र यांची छायांकीत प्रत अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र
झाल्यास पडताळणी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
II. माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.
III. अर्जात लिंग, वैवाहिक स्थिती याबाबतची माहिती अचूक नमूद करावी.
IV. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ईमेल आयडी, चालू भ्रमणध्वनी क्रमांक व पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक
नमूद करणे बंधनकारक आहे. आवश्यकतेनुसार पात्र/अपात्र यादीमधील निवडीकरिता पात्र ठरलेल्या
उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणी संदर्भात देण्यात येणा-या सुचना ईमेलव्दारे देण्यात येतील. तसेच
पात्र उमेदवारांपैकी गुणानुक्रमे निवडीस पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात
येईल. त्यामुळे ईमेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू राहतील व ईमेल वेळोवेळी तपासण्याची
जबाबदारी उमेदवारांची राहील. तसेच कंत्राटी पदभरती बाबत पात्र/अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी
आणि कंत्राटी पदभरती बाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी या कार्यालयाच्या
www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील. याकरिता उमेदवाराने
वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे देखील बंधनकारक आहे.
V. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. त्याबाबतचे विहित
प्रमाणपत्राची (Domicile Certificate) छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र
झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
VI. उमेदवाराने आपला धर्म व जातीचा प्रवर्गाचा तपशील अचूकपणे नमूद करावा. उमेदवार राखीव प्रवर्गात
मोडत असल्यास त्याबाबतचे विहित प्रमाणपत्राची स्वछायांकित प्रत सादरकरावे व आपण निवडीस पात्र
झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करावे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र सादर
न केल्यास अशा उमेदवाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
VII. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व
सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गात मोडणा-या उमेदवारांनी वैध उन्नत व प्रगत व्यक्ती/गटात मोडत
नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करावे व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी
दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. अन्यथा प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा
उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील.
VIII.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज करणा-या उमेदवाराने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate) व सामाजिक शैक्षणिक मागास प्रमाणपत्र (SEBC Certificate) सादर करावे व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करावे.
IX. अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अचूक नमूद करावा.
१०) संगणक अर्हता व इतर – MS-CIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा त्याबाबतचा तपशील नमूद
करुन जोडवा.
११) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र –
१) शासनाच्या धोरणानुसार उमेदवारास लहान कुटुंब धोरणाचे पालन करणे आवश्यक राहील.
२) तसेच अर्जासोबत सदर लहान कुटुंब छायांकित प्रमाणपत्र सादर करावे व उमेदवाराने आपण निवडीस पात्र
झाल्यास छाननी दरम्यान लहान कुटुंब असल्याबाबतचे मूळे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
३) सदर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना अर्जा सोबत जोडला आहे.
१२) उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी उमेदवाराने अलीकडील काळात काढलेला सुस्पष्ट फोटो व
स्वयंस्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करावेत.